Saturday, July 31, 2021

मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या": एकनाथ शिंदे


पुणे: कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर या भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.



(eknath shinde says centre govt should give big aid for flood affected Maharashtra)

कोकणात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


शिवसेनेची आरोग्य शिबिरे सुरू


सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास २५० पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  एकनाथ शिंदे यांनी केंद्राला आवाहन केले आहे.

वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका, मंत्रीमहोदयांचा वीज विभागातील अधिकाऱ्यांना सज्जड दम

 अमरावती : शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा इंग्रजांना सारखे वागू नका असा सज्जड इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शुक्रवारी अमरावतीत विज विभागातील अधिकाऱ्यांचा विविध विभागांची अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत प्रसंगी त्यांची कानउघाडणीही यशोमती ठाकूर यांनी केली.




अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम भरण्याचा तगादा अधिकार्‍यांकडून लावला जातो तसेच शेतकर्‍यांची वीज कापली जाते अशा अनेक तक्रारी पालकमंत्री यांच्याकडे आल्या होत्या.

याचा पाठपुरावा करताना पुराच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा ऊर्जा विभागावर ताण येतो आहे, याची माहिती आहे. मात्र, वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसाठी इंग्रजा सारखे वागू नका शक्य तितक्या नरमाईने प्रक्रिया पार पाडा, अशा सूचना यशोमती ठाकूर यांनी यावेळी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.


दरम्यान, अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांची ठाकूर यांनी चांगलीच कान उघाडणी केली अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

९ ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका

मुंबई : १५ जुलै रोजी राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. आता ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका शाळांमधून देण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. यासाठी विभागीय 

मंडळाकडून ७ ते ९ ऑगस्टदरम्यान गुणपत्रिका शाळांना देण्यात येणार आहेत.




शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार व कोविड संबंधित शासनाने, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करत गुणपत्रिकांचे वाटप करायचे आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा गुणपत्रिका ठरविलेल्या दिवशीच घेऊन जाण्यासाठी आग्रह करू शकणार नाही याबाबतीत स्पष्टताही मंडळाकडून देण्यात आली आहे.

निकालाचे गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख शाळांना वितरित करण्यासाठी विभागीय सचिवांना राज्य शिक्षण मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला, गणपतराव देशमुखांना नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

 मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राजकारणी गणपतराव देशमुख यांचा काल(३० जुलै) निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.


ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली


महाराष्ट्राचे उपमुख्यमनातरी अजित पवार यांनी ट्विट करून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला.


कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.


महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे . गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.




गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.


Friday, July 30, 2021

CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला



नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा... अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय. 



यंदाच्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे गेलेल्या बॅचने एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना केला आहे. शैक्षिणक क्षेत्रानेच गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले आहेत. तरीही, सध्याच्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वोत्तम योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन... असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात



भिवंडी : भिवंडी शहरातील नागरिकांना महानगर पालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला गेल्या काही दिवसापासून गढूळ व माती मिश्रीत दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब उलट्यासारखे आजार भेडसावू लागले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.



मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपूरा, निजामपूरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व माती मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.


पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास तक्रारी करून सुद्धा सराईतपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना जुलाब व उलट्या सारखे प्रकार होत आहेत. त्यातच सर्दी खोकल्याची साथ देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.


शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या मुख्य रस्त्यावरून तर काही गटारातून गेलेल्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांमधील नळाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून दुषीत पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने नळाला दुषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी भिवंडी जन संघर्ष समीतीच्यावतीने करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचारी महिलेचा भलताच दावा; "माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल"

पुणे : संभाषणाची ऑडिओ खोडसाळपणे व्हायरल केला असून, त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आल्याचा दावा पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने व्हायरल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 



पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी कर्मचा-याला एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचा-याला पैसे न देता बिर्याणी आणण्याचे आदेश दिले.

तेव्हा बिर्याणी घेतल्यानंतर आपल्याच ह्ददीतले हॉटेल आहे ना? मग त्याचालकाला पैसे कशाला द्यायचे, अशी विचारणा केली. या संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाचा ऑडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलासह समाजात खळबळ उडाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश


या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली असून, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. .तेव्हा या कर्मचाऱ्याने मॅडम साजूक तुपातील बियार्णी आणू का ?, असे त्यांना विचारले. फार स्पायसी नको....जरा तोंडाला टेस्ट पण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉंन्स पण आण.. बियार्णीचे पैसे कसे देणार असे नारनवरे यांनी विचारले असता त्याने बिर्याणी घेतल्यानंतर हॉटेलमध्ये पैसे देतो, असे सांगितले.


तेव्हा हद्दीतील त्या चालकाला पैसे कशाला द्याायचे, अशी विचारणा नारनवरे यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित झाली. मात्र, नारनवरे यांनी ध्वनीफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले.

दहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर; पोलिसांसमोर नवं आव्हान

नागपूर : राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू काश्‍मिरमध्ये घातपातासाठी ड्रोनचा वापर केला. आता नक्षलवाद्यांकडूनंही ड्रोनचा वापर होत असल्याची बाब, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी मान्य केली आहे.



सध्या नक्षलवादी ड्रोनचा वापर करतात तो फक्त पोस्ट सर्व्हिलन्ससाठी छत्तीसगड सीमेलगत किंवा मग बॉर्डरवर लागून असलेल्या पोस्टवर सर्वाधिक ड्रोनचा वापर नक्षलवादी करत असल्याचे लक्षात आलं आहे. आम्हीही ड्रोनचा वापर करतो की नक्षलवादी नेमके कुठल्या एरिया मध्ये लपून वगैरे बसलेला आहे, जेणेकरून आम्हाला ऑपरेशन प्लॅन करता येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.

गडचिरोली आणि गोंदियाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. डोंगरांवर बसून नक्षलवादी पोलीसांची टेहळणी करत असून घातपातासाठी वापरतात ड्रोन वापरतात, पण जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांना ड्रोन नेमके कुणी पुरवले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.


नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध आहेत. आपल्या पोलीसांकडेही ड्रोन आहे. त्यासोबतच नक्षलवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी पोलीसंही आता अँटीड्रोन खरेदी करणार आहे, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे.

मनसे दणका! मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चार निर्मात्यांना चोपलं

 मुंबई - मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे चांगलाच चोप दिला. उत्तरप्रदेश च्या या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपलं आहे .



या घटनेचा सविस्तर व्हिडियो चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की,'मनसे दणका! मुलींना चित्रपटा मध्ये रोल देण्याचे आमीश दाखवून गैर फायदा घेणारे हे 'उपरे' आणि शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी यांना मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष श्री पदमनाथ राणे यांनी मनसे दणका दिला.'



काय म्हणाले अमेय खोपकर


'चित्रपटसृष्टीत सध्या परप्रांतीय गुंडांचा सुळसुळाट झालेला आहे. आपल्याच राज्यातल्या नेत्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडांकडून माझ्या महाराष्ट्रातल्या माय-भगिनींना 'कास्टींग काऊच'चा सामनाही करावा लागतोय. हे अतिशय दुर्दैवी आहे. पण राजसाहेबांच्या तालमीत तयार झालेले आम्ही महाराष्ट्र सैनिक अशा गुंडांची गय करणार नाही. मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याच्या उद्देशाने संघर्ष करत असलेल्या माय-भगिनींना आमचा शब्द आहे की पुन्हा तुमच्याबरोबर असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही. या परप्रांतियांना आज तर आम्ही चांगलाच चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीनही केलंय, पण असेच बरेच लिंगपिसाट मोकाट फिरतायत, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेशी संपर्क साधा. तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर आहोत.'

विरारच्या आयसीआयसीआय बँकेत लुटीचा प्रयत्न, चाकू हल्ल्यात महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू



ठाणे : आयसीआयसीआय बँकेत घुसून दोन महिला कर्मचाऱ्यांवर माजी मॅनेजरने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी विरार येथील मनवेलपाडा सबवेजवळ घडली. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यास जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले आहे.



बेफाम झालेल्या या माजी मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून त्याने बँकेतील रोख रक्कम तसेच दागिनेही लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे.


आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बॅकेचा माजी मॅनेजर शिरला. त्यानंतर त्याने तेथील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.

बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चोरी करण्यापासून अटकाव केला. मात्र त्याने आपल्याकडील धारदार शस्त्राने दोघींवर प्राणघातक हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या जखमी महिला कर्मचाऱ्यास संजीवनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा थरारक प्रकार समजताच विरार पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

Thursday, July 29, 2021

तुमच्या मुलांकडे स्मार्टफोन आणि Social Media अकाउंट आहे का? होऊ शकतो गंभीर परिणाम

 मुंबई : सध्याच्या काळात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कोरोना काळात तर यात अधिकच वाढ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु सोशल मीडिया, इंटरनेटच्या वाढत्या वापरादरम्यान पालकांना आपल्या मुलांच्या विकासावर या सोशल मीडियाचा काय परिणाम होतो, हे माहित करुन घेणं आवश्यक आहे. याबाबतच राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोग अर्थात NCPCR ने केलेल्या अध्ययनात मोठा खुलासा झाला आहे.


पालकांकडून लहान मुलांना दिला जाणारा मोबाईल त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. केवळ दहा वर्षांची मुलंदेखील इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियावर अकाउंट तयार करत आहेत.

याबाबत राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाने धक्कादायक आकडे जारी केले आहेत. देशातील 6 राज्यात केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार, 10 वर्ष वयोगटातील 38 टक्के मुलांचं फेसबुकवर आणि 24 टक्के मुलांचं इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. लाखो मुलं स्मार्टफोनच्या अधीन झाली असून त्यांना सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवयच लागली आहे. सर्व्हेमध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई, भुवनेश्वर, रांची आणि गुवाहाटी सारखी शहरं सामिल होती. या सर्व्हेमध्ये 8 ते 18 वर्षातील 30.2 टक्के मुलांकडे आधीपासूनच स्मार्टफोन असल्याचं समोर आलं. 52 टक्के मुलं स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा वापर चॅटिंगसाठी करत असून ते व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या मेसिजिंग अ‍ॅपचा वापर करतात.

अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या फोनवरुन सोशल मीडिया अकाउंट बनवलं. लहान मुलांचं सोशल मीडियावर अकाउंट असल्यास त्यांना याच्या वापरापासून सतत कंट्रोल करता येऊ शकत नाही. अशात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचा कंटेंट असतो, त्यामुळे अश्लील किंवा इतर गोष्टींपर्यंत मुलं पोहचू शकतात आणि याचा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसंच सायबर बुलिंग, Internet Abuse चे प्रकारही घडू शकतात. अशा गोष्टी झाल्यास मुलं आपल्या पालकांना सांगण्यास धजावत नाहीत. अनेक मुलं इंटरनेटचं हे जगच खरं मानू लागतात आणि त्याचा परिणाम त्यांचा पाया भक्कम होण्याऐवजी कमकुवत होतो, आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

NCPCR ने स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मुलांवर काय परिणाम होतोय, हे पाहण्यासाठी 3491 मुलांवर अध्ययन करण्यात आलं. ज्यात 42.9 टक्के मुलांनी सोशल मीडिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट असल्याचं सांगितलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13 वर्ष वयाची मर्यादा आहे. परंतु अनेकांचं वयाच्या दहाव्या वर्षीच सोशल मीडिया अकाउंट आहे.

माणूसकीचा धर्म पाळत पूरग्रस्तांसाठी आजीने दिले चक्क बिस्किटाचे पूडे

 मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या संकटाना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात अन्न धान्य,कपडे, भांडी, जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यासाठी अनेक शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक, युवा सेना मदतीसाठी पुढे आली आहे.मुंबईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक भागातून मदत फेऱ्या सुरू झाल्या आहेत, तर अनेक ट्रक भरून मदत साहित्य घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी पुरग्रस्त भागात गेले आहेत.तर मुंबईकर देखिल पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करत असल्याचे चित्र आहे.



शिवसेना शाखा क्रमांक २०६ तर्फे काल शिवडी नाका टी.जे.रोड येथे मदत फेरी काढण्यात आली होती.हात माझे दगडाखाली.....मदत मी काय करू,झोळी माझी रिकामी दान मी काय करू,हरली आहे सगळ्याच बाजूने तरीदेखील माणुसकी धर्म नका विसरू, एकमेकां साह्य करू अशी साद घालत पूरग्रस्तांसाठी चक्क बिस्किटाचे पूडे या आजीने दिले. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली


शिवडी विभागातील दोस्ती फ्लेमिंगोच्या गेट बाहेरील बसणारी एक आजी. हि आजी तशी सर्वांच्या परिचयाची.गेली ४० वर्षांपासून आजी तेथे मातीचे मडके बनून विकते हा तिचा व्यवसाय. दहीहंडीच्या वेळेस शिवडीकर या आजीकडे मडके घेण्यासाठी येतात.कोरोनामुळे या आजीला व्यवसायातून तिला पोटापाण्यासाठी देखील कमविणे थोडे कठिण झाले आहे. या मदतफेरीला या आजीने गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे याची ग्वाही देत सढळ हस्ते या पूरग्रस्तांसाठी बिस्किटाचे पूडे दिले अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.

प्रताप सरनाईक यांचा किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केला १०० कोटींचा दावा

 मीरारोड - आपल्यावर निराधार, बेछूट , बेजबाबदार आरोप करून आपली बदनामी करण्याची मोहिम चालवणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे.



त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी , आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. मुख्यमंत्री , नगरविकासमंत्री , गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता.

याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता व पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.


त्या आधी पासून किरीट सोमय्या यांनी आमदार सरनाईक यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी आ. सरनाईक यांच्या विरोधात बदनामी करणारे बॅनरही लावले होते. केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार म्हणून केवळ राजकीय हेतूने बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करीत होते असे आ. सरनाईक यांचे म्हणणे होते.


सोमय्या यांनी मीरा भाईंदर व ठाण्यात येऊन पत्रकार परिषदेत आ. सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी , त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी सोमय्या यांनी ठरवून सर्व काही केले असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.


त्यावेळी सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस आ. सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती व बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत सांगितले होते. सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोलल्याप्रमाणे आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी कोर्टात जवळपास ३ लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.


सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करून त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरु केली. सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला , माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे , त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे , असे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी

 अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी


मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढताना दिसत असून सीबीआयने तपास चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय मार्फत करण्यात आली आहे.



सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले.


राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवले.

आजतक/ इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांव्यतिरिक्त मुंबई आणि अहमदनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या जागेंची झडती घेण्यात आली. राजू भुजबळ हे समाजसेवा शाखेचे प्रभारी होते आणि एसीपी संजय पाटील हे देखील त्याच शाखेशी संबंधित होते. भुजबळ आणि पाटील यांचीही ईडीने चौकशी केली होती. दरम्यान या प्रकरणातील संशयितांना सीबीआय अटकही करू शकते, अशी माहिती मिळाली आहे.




बुधवारी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर मध्ये चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू भुजबळ अधिकाऱ्याच्या गावात जाऊन त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मुंबई पोलिसांत उपायुक्त पदावर कार्यरत असलेले राजू भुजबळ यांचे मुळ गाव अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात आहे. बुधवारी या ठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आणि त्यांचा जबाब नोंदवला. या बाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसून दोन वाहनांमधून हे अधिकारी आले होते.

Wednesday, July 28, 2021

इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा झाल्या कमी; दशकभरातील सर्वाधिक कपात, ६३ शिक्षणसंस्था बंद

 मुंबई : गेल्या दहा वर्षांतील इंजिनीअरिंगच्या जागांमधील सर्वांत मोठी कपात यंदा झाली आहे. इंजिनीअरिंगच्या १.४६ लाख जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे जागांचा एकूण आकडा २३.२८ लाख झाला.


यंदा विद्यार्थ्यांअभावी तसेच अन्य कारणांनी ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद होणार आहेत. अशी स्थिती २०१५-१६ सालानंतर उद‌्भवली आहे. त्या वर्षी इंजिनीअरिंगच्या जागांमध्ये मोठी कपात झाली होती. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या संस्थेने म्हटले की, जागांमध्ये यंदा मोठी कपात झाली असली तरी तंत्रशिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांत आजही ८० टक्के विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहेत.



२०१५-१६ सालापासून दरवर्षी किमान ५० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे शिक्षणसंस्था बंद करण्याचा आदेश देण्यात आला नाही. यंदा ६३ इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ४०० शिक्षणसंस्था पडल्या बंद

२०१४-१५ साली देशभरात इंजिनीअरिंगचे ३२ लाख विद्यार्थी होते. मात्र या शाखेची मागणी कमी झाल्याने त्या वेळेपासून आतापर्यंत सुमारे ४०० इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था बंद पडल्या आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५२ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था सुरू करण्यास एआयसीटीईने परवानगी दिली आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, देशाच्या मागास भागात नवीन शिक्षणसंस्था उघडण्यासाठी केंद्राने संमती दिली आहे. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे १४३, १५८, १५३ नव्या इंजिनीअरिंग शिक्षणसंस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली.


विद्यार्थ्यांची झाली फसवणूक

बंद झालेल्या शिक्षणसंस्थांपैकी काही ठिकाणी योग्य शैक्षणिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा नव्हत्या. अध्यापकही अपुरे होते. अशाही स्थितीत या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करीत होत्या. अशा संस्था बंद होणे ही इष्टापत्तीच आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!


ठाकरे सरकारकडून पालकांना दिलासा ; राज्य मंत्रीमंडळात निर्णय 

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज(२८ जुलै) बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. १५ टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे.मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून सातत्याने पुढे येत होत्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



कोरोना परिस्थितीमुळे शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. या परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याचं स्ट्रक्चरच असं केलं पाहिजे, जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान १५ टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे, असं सुप्रिम कोर्टाने सुचवलं होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी शाळांचीफी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.


कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत. यावर ३ आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने २२ जुलै रोजी सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेते वर्गाला दणका देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असं मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केलंय.

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा


मुंबई : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण महाड,नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 




महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली. यानंतर ऊर्जामंत्री यांनी राजावाडी तसेच विरेश्वर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली.तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.

महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला.वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर विद्युत विभाग करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असतानादेखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत.त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ.राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले.


पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत.बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१,तर ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅक्सीनेशन सेंटरपैकी ३, तसेच ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन

पुणे : दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते.अर्जुन पुरस्कार मिळवलेले ते पहिले खेळाडू होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकात क्रीडा क्षेत्र गाजवलेल्या खेळाडूंमध्ये नाटेकर यांचा समावेश होता. नाटेकर यांनी राष्ट्रीय ज्यूनिअर टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे त्यांनी उपविजेतेपद देखील पटकावले होते. टेनिस आणि बॅडमिंटन या दोन्ही खेळावर समान प्रभुत्व असलेल्या नाटेकर यांनी नंतर करिअर म्हणून बॅडमिंटनची निवड केली.


सांगलीमध्ये जन्म झालेल्या नाटेकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 साली सर्वप्रथम देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती.

विदेशात बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी 1956 साली मलेशियातील स्पर्धेत ही ऐतिहासिक कामगिरी केली.



नाटेकर यांनी थॉमस कप स्पर्धेतही ठसा उमटवला होता. या स्पर्धेतील एकेरीच्या 16 पैकी 12 तर दुहेरीच्या 16 पैकी 8 लढती त्यांनी जिंकल्या. या स्पर्धेत त्यांनी तीन वेळा भारताचे नेतृत्त्व देखील केले होते. बॅडमिंटन क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना 1961 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले क्रीडापटू होते.

बारावीच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण तीन दिवसात निकाल लागण्याची शक्यता

Mumbai : येत्या तीन दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचे काम का जवळपास पूर्ण झालेले आहे. अशी माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा जून महिन्यात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु पुढच्या महिन्यातच मूल्यमापन कार्यपद्धती ठरवण्यात आली. आणि याच मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचा निकाल लावण्याचा मंडळाने निर्णय घेतला. आता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज 99 टक्के पूर्ण झाले आहे.

यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 13 लाख 23 हजार 698 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 लाख 22 हजार 249 विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील बारावीचा निकाल 31 जुलै पूर्वी जाहीर होईल असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून अगोदरच शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tuesday, July 27, 2021

नाशिक, पुणेनंतर आता ठाणे महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरु, सीकेपी हॉलमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

ठाणे : नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

(Raj Thackeray's meeting with MNS party workers in Thane)




ठाण्यातील CKP हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. या संवादात ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहणं गरजेचं आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे शहरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनरबाजी आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत.


पुण्यात राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका


दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा 'राजसंवाद' हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.


मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर


दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.


45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा


दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.


Monday, July 26, 2021

मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा

 मुंबई: चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेने आमदार आणि खासदारांचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. या महिलेच्या मागणीची भाजपने गंभीरपणे दखल घेत मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीसांना दिलं आहे. (mumbai bjp corporator to donate one month salary to flood relief fund)



राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटुंबियांना उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास भाजपच्या वतीने पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते. या पार्श्वभूमीवर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार : अजित पवार


सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधला. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं.




राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. सर्व नुकसांनीची माहिती घेतली जात आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत.

मात्र येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.


शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या विविध मागण्या आहेत. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला समन्वय आहे. केंद्राकडूनही राज्याला मदत सुरु आहे. दोन नुकसानीची माहिती मिळेल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.



मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली, कोल्हापूर, रायगड, सांगली याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतील. तळीये गावात साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे. वायूदलाकडून जेवणाची पाकिटं वाटली जात आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

अकरावी प्रवेशाची 'सीईटी' परीक्षा विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी 'सीईटी' चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे.



येत्या 21 ऑगस्ट रोजी 'सीईटी' परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 20 जुलै रोजी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.मात्र हे संकेतस्थळ तांत्रिक अडचणी मुळे बंद पडले होते.

आता पुन्हा सुविधा सुरू होत आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी , मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल.


ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरताना एस एस एसईबीसी प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा ईडब्लू हा प्रवर्ग निवडावा लागेल. प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तद्नंतर अकरावी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.


20 व 21 जुलै या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकतानाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.


सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन पालक करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राज्य मंडळाची दहावीची परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Sunday, July 25, 2021

Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना

डोंबिवली: कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे सोमवारी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील डॉक्टर विनय कुमार सचान यांच्या स्मारकाचा जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना वाहण्यात आली. 26 जुलै 1999 हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो, भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे तत्कालीन दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळीही भाजप सरकारने पाकिस्तानला मान खाली घालण्यास भाग पाडले, त्या कारगिल युद्धामध्ये आपले बरेच जवान शहीद झाले अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले होते, परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले त्या सर्व आपल्या देशातील शहिदांना मनपूर्वक मानवंदना देण्यात आल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले.



त्या उपक्रमाला भाजपचे प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, पुनम पाटील ,मनिषा केळकर, नगरसेवक राहुल दामले, विशू पेडणेकर, निलेश म्हात्रे, विनोद कालन, संदीप पुराणिक, खुशबू चौधरी,प्रमिला चौधरी,पदाधिकारी संजू बिडवाडकर , संजय कुलकर्णी सुरेश पुराणिक युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश पेणकर यांच्यासह आबालवृद्ध नागरीक उपस्थित होते.

Saturday, July 24, 2021

जीव लावून लढला पण फक्त एका चुकीमुळं महाराष्ट्राच्या प्रवीणचं मेडल हुकलं!

मुंबई : टोकयो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या मिश्र गटात महाराष्ट्राचा प्रवीण जाधव आणि बिहारची दिपिका कुमारी हे दोघेजण देशाचं नेतृत्व करत होते. या दोघांनी क्वार्टर फायनलपर्यंत उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं. मात्र, आज क्वार्टर फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे.



प्रविण जाधव याच्याकडून शेवटच्या राऊंडमध्ये एक चूक झाली होती. याच चुकीचा फटका देशाला बसला आहे. दक्षिण कोरियाच्या जोडीनं दिपिका आणि प्रविणच्या जोडीचा 6-2 असा पराभव केला आहे. यामुळे टोकिया ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या बाबतीत भारताच्या पारड्यात निराशा पडली आहे.


आजच्या मॅचमधील पहिले दोन सेट दक्षिण कोरियाच्या जोडीने आपल्या नावावर करुन घेतले.

यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दिपिका आणि प्रविणने आघाडी करत सेट आपल्या नावावर करुन घेतला. शेवटच्या सेटमध्ये देखीलह भारताने आघाडी टिकवून ठेवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी प्रविण केवळ 6 पॉईंट्स मिळवू शकला. क्वार्टर फायनलमध्ये प्रविणची हीच चूक भारताच्या पराभवाचं कारण ठरली आहे.

दरम्यान, आजचा हा सामना चांगलाच अतितटीचा झाला आहे. दिपिका आणि प्रविणची यापूर्वीची खेळी पाहता चाहत्यांना विजयाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना निराशा सहन करावी लागत आहे.

मराठा आरक्षणाला गती, अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र


मुंबई - महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.



चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच ५० टक्क्यांच्या वर गेलेली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ८ जून २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.



मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची ५० टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ५ जुलै २०२१ रोजी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेऊन सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

तळीये ग्रामस्थांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाड, 24 जुलै : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर (Extreme heavy rainfall) दरड कोसळून मोठी दुर्घटना (landslide) घडली. रायगड जिल्ह्यातील महाड जवळ असलेल्या तळीये या गावातील 35 घरांवर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. तर अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत.

यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळयात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल.


ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...