Friday, July 30, 2021

CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला



नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा... अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय. 



यंदाच्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे गेलेल्या बॅचने एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना केला आहे. शैक्षिणक क्षेत्रानेच गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले आहेत. तरीही, सध्याच्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वोत्तम योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन... असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...