नागपूर : राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमध्ये घातपातासाठी ड्रोनचा वापर केला. आता नक्षलवाद्यांकडूनंही ड्रोनचा वापर होत असल्याची बाब, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी मान्य केली आहे.
सध्या नक्षलवादी ड्रोनचा वापर करतात तो फक्त पोस्ट सर्व्हिलन्ससाठी छत्तीसगड सीमेलगत किंवा मग बॉर्डरवर लागून असलेल्या पोस्टवर सर्वाधिक ड्रोनचा वापर नक्षलवादी करत असल्याचे लक्षात आलं आहे. आम्हीही ड्रोनचा वापर करतो की नक्षलवादी नेमके कुठल्या एरिया मध्ये लपून वगैरे बसलेला आहे, जेणेकरून आम्हाला ऑपरेशन प्लॅन करता येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.
गडचिरोली आणि गोंदियाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. डोंगरांवर बसून नक्षलवादी पोलीसांची टेहळणी करत असून घातपातासाठी वापरतात ड्रोन वापरतात, पण जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांना ड्रोन नेमके कुणी पुरवले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती आहे.
नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध आहेत. आपल्या पोलीसांकडेही ड्रोन आहे. त्यासोबतच नक्षलवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी पोलीसंही आता अँटीड्रोन खरेदी करणार आहे, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment