Thursday, September 9, 2021

NCB ची मुंबईत मोठी कारवाई, Dawood Ibrahim च्या हस्तकाच्या आवळल्या मुसक्या

मुंबई, 9 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) एक मोठा झटका बसला आहे. एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत दाऊदचा जवळचा हस्तक असलेल्या आरिफला बेड्या ठोकल्या आहेत.

एनसीबीने (NCB) बुधवारी मुंबईत (Mumbai) कारवाई करुन मोहम्मद आरिफ (Mohammed Arif) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. एनसीबीची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. (NCB arrested drug peddler Mohammed Arif in Mumbai) मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आरिफ हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. अंमली पदार्थ तस्करीत त्याचा मोठा सहभाग असायचा.



लहान मुलांच्या मार्फत आरिफ अंमली पदार्थांची तस्करी करत असे. या प्रकरणात एनसीबीने बुधवारी त्याला मुंबईतून अटक केली आहे.

चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा


बिजिंग: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापन केली.

तालिबानच्या या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झाली नसून, तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आताच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीत असल्याचे दिसत आहे. अशातच आता चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. (china announced of 310 million dollar aid to the new taliban government in afghanistan)



अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा


अफगाणिस्तानमधील अराजकता समाप्त करण्यासाठी आणि योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला मदतीची गरज असून, यासाठी अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान सरकारला ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा चीनकडून करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


आर्थिक मदतीसह औषधे, लसीही देणार


चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे याचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात चीन अफगाणिस्तानला ३० लाख लसी दान म्हणून देणार असल्याचे समजते.

Tuesday, September 7, 2021

मीरा रोडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले, घटनेने परिसरात खळबळ

मीरा रोड : मीरा रोड परिसरातील एका इमारतीत तिघांचे मृतदेह (3 dead bodies found) आढळून आले आहेत. मीरा रोड परिसरातील नरेंद्र पार्क इमारतीत (Narendra Park Mira Road) राहणाऱ्या कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले आहेत.



या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मीरा रोड परिसरातील नरेंद्र पार्क इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाचे बंद खोलीत मृतदेह आढळून आले आहेत. कुटुंबातील तिघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळू आले आहेत.


मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. तिघांचे मृतदेह पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतकांमध्ये आई - नसरीन वाघू (वय 43 वर्षे), मुलगी - सदद नाझ (वय 20 वर्षे) आणि अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी हे दोघेही गतीमंद होते.


सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणी नयानगर पोलीस अधिक तपास करत आहेत. नगरमध्ये तिघांची आत्महत्या तर तिकडे अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर जिल्ह्यातील केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

उपवास करणं आरोग्यासाठी लाभदायक की हानिकारक? पाहा काय सांगतात तज्ज्ञ

नवी दिल्ली 07 सप्टेंबर : कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची (Food) गरज असते, तसंच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषक तत्त्वांची (Nutrients) गरज असते.

आठवड्यातून एक दिवस उपवास (Fasting) करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत रूढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत व्रताच्या निमित्ताने उपवास करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे; मात्र आता अनेक विशेषज्ञही उपवास करण्याला प्रोत्साहन देऊ लागले आहेत.



इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तातल्या उल्लेखानुसार, होलिस्टिक लाइफस्टाइल कोच (Holistic Lifestyle Coach) ल्यूक कुटिन्हो म्हणतात, 'सगळ्या धर्मांमध्ये उपवासाला महत्त्व आहे. आरोग्य (Health) आणि अध्यात्म या दोन्हींसाठी उपवास लाभदायक आहे. उपवास म्हणजे उपाशी राहणं नव्हे किंवा आपल्याकडे काही खाद्यपदार्थ नाहीयेत म्हणून काही न खाणं असं नव्हे, तर उपवास म्हणजे एक शिस्तशीर पद्धत आहे. त्या माध्यमातून आपण शरीर आणि पचनसंस्था (Digestive System) या दोन्हींनाही थोडी विश्रांती देतो; उपवासामुळे शरीरातली ऊर्जा पुनरुज्जीवित होते. उपवासामुळे शरीरातले विषारी घटक (Toxic Elements) बाहेर पडण्यास मदत होते.


'अनाहत ऑरगॅनिक'च्या संस्थापिका राधिका अय्यर तलाती यांनी इन्स्टाग्रामवर उपवासाबद्दल माहिती दिली आहे आणि एका व्हिडिओद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. 'उपवासाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच; पण मेंदू अधिक उत्तम पद्धतीने काम करू लागतो. मी गेल्या 11 वर्षांपासून उपवास करते. त्यामुळे माझं वजन अनेक किलोग्रॅम्सनी घटवण्यात यश आलं आहे. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. माझी बुद्धी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. माझ्या शरीराची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली आहे. पचनशक्ती सुधारली आहे. पूर्वी माझ्या त्वचेला अॅलर्जी यायची. आता ती अॅलर्जी (Allergy) गायब झाली आहे. चेहऱ्यावर तेज आलं असून, केसही चांगले वाढू लागले आहेत,' असं राधिका यांनी सांगितलं.


राष्ट्रीय पोषण सप्ताह: कोणत्या वयात कसा असावा आहार? वेगवेगळा असतो Diet Plan


'अनेक जण केवळ बोअर होतं म्हणून खातात, हे मी अनुभवलं आहे. अशा अनेक व्यक्तींना मी काही काळ उपवास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यांच्या जीवनात त्यामुळे बदल घडून आला आहे,' असंही राधिका यांनी सांगितलं.


कोटिन्हो यांनी सांगितलं, 'उपवास सगळ्यांना लाभदायक ठरतो असं नाही, जमतो असं नाही किंवा आवडतो असं नाही; पण उपवासाची अनेक रूपं, अनेक प्रकार आहेत. आपल्याला जमेल त्या प्रकारचा उपवास करू शकता. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये (Intermittent Fasting) खाण्याबद्दलचा कोणताही नियम न पाळता काही कालावधीनंतर उपवास केला जातो. ड्राय फास्टिंगमध्ये (Dry Fasting) पाणीही न पिता उपवास केला जातो.'

एकंदरीत पाहता डाएटिशियनच्या सल्ल्याने उपवास केला तर शरीराला लाभदायकच ठरतं.

Monday, September 6, 2021

इम्यूनिटी वाढवणार्‍या जीवनशैलीसाठी आयुष मंत्रालयाने सुरू केले अभियान, 75 लाख लोकांना करणार 'रोगप्रतिबंधक औषधां'चे वितरण



नवी दिल्ली : Immunity | देशभरात 75 लाख लोकांना आयुष प्रोफिलॅक्टिक मेडिसिन (Ayush Prophylactic Medicines), डाएट आणि जीवनशैलीवर लिहिलेली मार्गदर्शक तत्त्वे वितरित करण्यासाठी सरकारने एक अभियान सुरू केले आहे.




महामारीच्या या कठिण काळात सरकारच्या या अभियानातून इम्यूनिटी (Immunity ) वाढवणारी जीवनशैली (lifestyle) चांगली बनवण्यात मदत होईल.

इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड ब्रॅकेटवर लक्ष


PHDCCI चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप मुल्तानी यांनी एका वक्तव्यात म्हटले की, हा उपक्रम इम्यूनिटीयुक्त जीवनशैलीसाठी एक महत्वाची भूमिका पार पाडेल. कोरोना संकटाच्या या काळात लोकांच्या इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड ब्रॅकेट (ज्येष्ठ आणि फ्रंटलाइन वर्कर्स) वर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या अभियानाची सुरुवात केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष मुंजपारा राज्यमंत्री (MoS) यांनी 2 सप्टेंबरला केली होती.


औषधाचे 75 लाख लोकांना वाटप


या अभियानांतर्गत, पुढील वर्षात इम्यूनिटी वाढवणारे औषध आणि कोरोना महामारीला नियंत्रणात ठेवणारे उपाय लक्षात घेऊन तयार केलेली लेखी मार्गदर्शक तत्त्वांचे वितरण देशभरात 75 लाख लोकांना केले जाईल. आयुष मंत्रालयाचे हे अभियान 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर फोकस करेल.


CCRAS ने तयार केले आयुर्वेदिक औषधांचे किट


कोरोना महामारीला प्रतिबंध करणार्‍या आयुष मेडिसिनच्या किटमध्ये संशामणी वटी (Sanshamani Vati) (ज्यास गुडुची किंवा गुळवेल घन वटी सुद्धा म्हटले जाते) आणि अश्वगंधा घन वटी (Ashwagandha Ghan Vati) आहे.


रोगप्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे हे किट आणि मार्गदर्शक तत्त्व सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक मेडिसिन (CCRAS) ने तयार केले आहे.


सर्वांसाठी आरोग्य


कोरोना महामारीला प्रतिबंध लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या विशेष अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी

आयोजित एका सभेला संबोधित करताना केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले होते की,

या अभियानाचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आणि अभियानाला खरे रूप देण्याचे योगदान आहे.


जेणेकरून 'सर्वांसाठी आरोग्य' दिले जाऊ शकते.

त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी सात कामांना सूचीबद्ध केले आहे

आणि त्यापैकी पहिले काम ज्येष्ठांची देखभाल करणे आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ, मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

अशातच सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या सावात पार पडणार आहे.



एकनाथ शिंदे म्हणाले की, "यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावाकडे जाणाऱ्यांना टोलमाफीचे स्टिकर पुरवले जाणार आहेत. त्यासाठी चाकरमान्यांना आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. गणेश आगमनाच्या दोन दिवसआधीपासून या टोलमाफीला सुरुवात होईल आणि गणेश विसर्जनानंतर दोन दिवसापर्यंत ही टोलमाफी असेल."


टोलमध्ये सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशन, आरटीओ कार्यालयात आपला वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव व प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव

बेळगाव - महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे.

(Belgaum Municipal Corporation Election Results) बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, एकीकरण समितीच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या आहेत. (BJP has a clear majority in Belgaum Municipal Corporation, Maharashtra ekikaran samitee has suffered a crushing defeat)




बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पक्षीय पद्धतीने लढवली गेल्याने या निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने बेळगाव महानगरपालिकेच्या निकालांमध्ये वर्चस्व दिसून आले. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली. अखेर भाजपाने ३६ जागांवर बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसच्या खात्यात ९ जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला २ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.


मतमोजणीदरम्यान बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागल्यामुळे भाजप क्लीनस्वीप कडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत होते. यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायकरीत्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली.


बेळगाव महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हा प्रश्न अनेक दिवसांपासून सतावत होता, अनेक जाणकारांनी तज्ञांनी या वेळी कोणालाही एक हाती सत्ता करता येणार नाही. असे भवितव्य व्यक्त केले होते. मात्र भाजपची वाटचाल जोरदार सुरू झाल्याने आणि सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त विजयाकडे वाटचाल केल्याने निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागत आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...