Tuesday, September 7, 2021

मीरा रोडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले, घटनेने परिसरात खळबळ

मीरा रोड : मीरा रोड परिसरातील एका इमारतीत तिघांचे मृतदेह (3 dead bodies found) आढळून आले आहेत. मीरा रोड परिसरातील नरेंद्र पार्क इमारतीत (Narendra Park Mira Road) राहणाऱ्या कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले आहेत.



या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मीरा रोड परिसरातील नरेंद्र पार्क इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाचे बंद खोलीत मृतदेह आढळून आले आहेत. कुटुंबातील तिघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळू आले आहेत.


मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. तिघांचे मृतदेह पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतकांमध्ये आई - नसरीन वाघू (वय 43 वर्षे), मुलगी - सदद नाझ (वय 20 वर्षे) आणि अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी हे दोघेही गतीमंद होते.


सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणी नयानगर पोलीस अधिक तपास करत आहेत. नगरमध्ये तिघांची आत्महत्या तर तिकडे अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर जिल्ह्यातील केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...