बिजिंग: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापन केली.
तालिबानच्या या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झाली नसून, तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आताच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीत असल्याचे दिसत आहे. अशातच आता चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. (china announced of 310 million dollar aid to the new taliban government in afghanistan)
अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा
अफगाणिस्तानमधील अराजकता समाप्त करण्यासाठी आणि योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला मदतीची गरज असून, यासाठी अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान सरकारला ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा चीनकडून करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आर्थिक मदतीसह औषधे, लसीही देणार
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे याचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात चीन अफगाणिस्तानला ३० लाख लसी दान म्हणून देणार असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment