Sunday, March 20, 2022

देशात आपणच तारणहार असल्याचा देखावा सुरुमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कश्मीर फाईल चित्रपटावरून भाजपवर निशाणा

देशात आपणच तारणहार असल्याचा देखावा सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कश्मीर फाईल चित्रपटावरून भाजपवर निशाणा

मुंबई :राज्यात आणि देशात कश्मीर फाईल या चित्रपटावरुन वातावरण तापले असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? काहीच नाही. चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. “सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.
     पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी कोणाच्या काळात झाल्या. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. त्यावेळीही यावरुन टीका झाली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक हे सर्व आम्ही पाहत आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. आपण केलेली कामं जनतेसमोर मांडणं, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणं, विरोधकांवर आरोप करणं आणि अफवा पसरवणं या चार फळ्या होत्या आणि भाजपा यावर पावलं टाकत आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणं आणि आपणच तारणहार आहोत हे बिंबवणं झालं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Saturday, March 19, 2022

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

मुंबई - महाराष्ट्रात होळीनंतर राजकीय धुळवडीला सुरूवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकतेच भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

या भेटीनंतर राज्यात सत्तेच्या घडामोडी घडतायेत का? अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं राज्यात खळबळ उडाली. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असं मला माहित आहे किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल. संपर्कात असतील तर घ्या ना, थांबला कशाला होळी संपली आहे. कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही. आम्ही असं बोललो तर भाजपाचे(BJP) ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

राज्यातील मतदारांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरुण घेतलं आहे. त्यामुळे आता ते हिरव्याचं समर्थन करतात. भगव्याचं समर्थन करत नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले २५ आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. निवडणुका जवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येते. नाव सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल असंही रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) म्हणाले.

२५ मार्चला योगी आदित्यनाथ शपथविधी, अखिलेश, ममतांना निमंत्रण

२५ मार्चला योगी आदित्यनाथ शपथविधी, अखिलेश, ममतांना निमंत्रण

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेले भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी दुपारी चार वाजता इकाना स्टेडीयम मध्ये दुसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आशहेत.

पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आदित्यानाथानी गेल्या ३७ वर्षांच्या अंधश्रद्धेला तडा दिला आहे. या शपथविधी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रक्षामंत्री राजनाथसिंग, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा उपस्थित राहत आहेत तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ज्येष्ठ नेते मुलायमसिंग, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, बहुजन समाजवादीच्या मायावती यानाही आमंत्रण दिले गेल्याचे समजते.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला संघ आणि भाजपचे अन्य वरिष्ठ नेते आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. याच वेळी नवीन मंत्र्यांना सुद्धा शपथ दिली जाईल असे सांगितले जात आहे. या वेळी योगींच्या मंत्रिमंडळात महिला आणि युवा आमदारांना अधिक संधी दिली जाईल असे संकेत दिले गेले आहेत. शपथविधीला राज्य आणि केंद्र सरकारी योजनाच्या लाभार्थीना ही आमंत्रित केले गेले असून साधारण ४५ हजार लोक या वेळी हजर राहतील असे समजते. २०० व्हीव्हीआयपी ना आमंत्रण दिले गेले आहे.

Thursday, March 17, 2022

ऑनलाईन क्लासेच तुमच्या चिमुकल्यांवर पडतायत भारी, 'या' समस्यांचे प्रमाण वाढले- तज्ज्ञ

ऑनलाईन क्लासेच तुमच्या चिमुकल्यांवर पडतायत भारी, 'या' समस्यांचे प्रमाण वाढले- तज्ज्ञ

मुंबई : कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांच्या अनेक अडचणी वाढल्या. चुकीच्या पद्धतीनं (Posture) बसल्यामुळं लहान मुलांमध्ये मान आणि पाठदुखीचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रुग्णालयात मुलांना भेडसावणार्‍या समस्यांशी संबंधित प्रकरणांपैकी ५० टक्के समस्या ऑनलाइन क्लासेसद्वारे वाढल्या आहेत.

एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या  वृत्तात, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन (Orthopedic and Robotic Joint Replacement Surgeon) आणि एनएचएस हॉस्पिटल, जालंधरचे संचालक शुभांग अग्रवाल यांनी सांगितले की, 'स्क्रीनसमोर असताना चुकीच्या स्थितीत बसणे आणि या काळात कमी झालेल्या शारीरिक हालचालींमुळे मुले मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहेत, तसेच बहुतेक मुलांचे वजन वाढले असल्याचेही दिसून येत आहे. त्यांची सहनशक्ती कमी झाल्याचेही दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये स्ट्रेसही वाढला आहे आणि त्यांचं मन वारंवार विचलित (Neck and Back lodged Due to Online Class) होत आहे.

इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटर, दिल्ली येथील बालरोग आर्थोपेडिक सल्लागार (Pediatric Orthopedic Consultant) डॉ. सुरभीत रस्तोगी यांच्या मते, अलिकडे मुलांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते एवढा वेळ घरात चुकीच्या पद्धतीनं बसत आहेत, मुलांचे सूर्यप्रकाशात बाहेर पडणे बंद झाले आहे. जास्त वेळ स्क्रीनवर घालवणाऱ्यांनी खबरदारी म्हणून काही उपाय अवलंबले पाहिजेत. कॅल्शियम युक्त आहाराप्रमाणे, सूर्यप्रकाश घेणे, दर अर्ध्या तासाने ब्रेक घेणे. याशिवाय मुलांना दररोज इनडोअर किंवा आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा लागेल, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावे लागतील आणि पाठीचा योग्य आधार घेऊन खुर्चीवर बसावे लागेल.

ऑनलाइन क्लासमध्येच स्ट्रेचिंग व्यायाम
डॉ. रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, जे शिक्षक मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेत आहेत, त्यांनी मुलांना ५ मिनिटांच्या काही मजेशीर स्ट्रेचिंग अ‍ॅक्टिव्हिटी करायला लावाव्यात. १० मिनिटे बसल्यानंतर मुलांना एकदा इकडे तिकडे उभे करून स्ट्रेचिंग प्रकार करवून घ्या. त्यामुळे मुले निरोगी राहतील.

वेदना हलक्यात घेऊ नका
ऑर्थोपेडिक सर्जन, उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटल आग्रा येथील डॉ. विशाल गुप्ता म्हणतात, "जेव्हा मुले पाठदुखीची तक्रार करतात, तेव्हा अनेक वेळा गंभीर कारण असते, मग ते दुखापत, संसर्ग किंवा ट्यूमर असू शकतो. त्याला तातडीने रुग्णालयात नेवून तपासणी केली पाहिजे.

आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबईः 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित 'द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन बराच रोजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.

महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभेत केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''द कश्मीर फईल्स' काय घेऊन बसलात? आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही 'ठाकरे' हा सिनेमादेखील महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. अशाप्रकारची मागणीही कधी केली नाही,'' असं संजय राऊत म्हणाले.

'द काश्मीर फईल्स' चित्रपटावरुन सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत बोलताना 'मिशन मंगल', 'तानाजी', 'पानिपत' हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करुन दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हा चित्रपट करमुक्त करावा, असे म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?
विधानसभेत अजित पवारांनी भाजपची कोंडी केली, तर आज संजय राऊतांनीही भाजपला घेरले. ''आता त्यांना काश्मीर आठवले आहे. नरेंद्र मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरुन राजकारण करू नये,'' असे राऊत म्हणाले.

'बाळासाहेबांनी काश्मीरसाठी खूप काही केलं'
राऊत पुढे म्हणतात की, ''काश्मीर प्रकरणावर आम्ही कधीच राजकारण केले नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते, तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी देणारे बाळासाहेब पहिले नेते होते. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के राखीव जागा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. पण आम्ही चित्रपट काढून प्रचार केला नाही, राजकारण केले नाही. त्यामुळे कोणत्या विषयाचे राजकारण करायचे त्याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे,'' अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Wednesday, March 16, 2022

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

 १७ वर्षांनी समस्या मार्गी ; आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा


ठाणे (प्रतिनिधी ) : मध्य वैतरणा प्रकल्पातील  प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा आणि नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

मध्य वैतरणा प्रकल्पातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावाच्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांना  नुकसान भरपाई आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने १० मार्च २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. बेल्हारे यांच्या दालनात आमदार संजय केळकर आणि प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत बैठक झाली. 
मध्य वैतरणा प्रकल्पात येथील आदिवासींची जमीन आणि वडिलोपार्जित शेती संपादित केली गेली आहे. त्यातील अनेकांना मोबदला मिळाला, परंतु १९ प्रकल्पग्रस्तांना मोबादलमिळलेला नाही. गेल्या १७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची नोकरीत सामावून घेण्याची आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा आणि झाडीचा मोबदला मिळण्याची मागणी तसेच २००५ ते २०२१ या काळात शेती न झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रतिवर्षी एक लाख रुपये कृषी मंजुरीसाठी मागणी आहे. 

याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होऊन प्रथम नोकरीस पात्र असतील अशा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांना आवश्यक आणि प्रचलित कायद्याच्या आधारे आर्थिक निकसं भरपाई देण्यात यावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त ल बेल्हारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून तत्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सूचनाही बेल्हारे यांनी बैठकीत दिल्या.

गेले अनेक वर्षे या प्रकरणी जिल्हा स्तरापासून मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. मात्र आमदार संजय केळकर यांनी आमची व्यथा समजून घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांकडे मांडल्या आणि तत्काळ कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आमदार संजय केळकर आम्हाला न्याय मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.

या बैठकीत आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त बेल्हारे, महापालिका अधिकारी गायकवाड तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे, काथोड आदी उपस्थित होते.

सोनिया गांधी म्हणाल्या,"राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्करपणे होतोय वापर

सोनिया गांधी म्हणाल्या,"राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्करपणे होतोय वापर"

नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीनंतर पाहिल्याचं काँग्रेसच्या हंगामीअध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपले निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी देशात सोशल मीडियाच्या होत असलेल्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त करत राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत ट्वीटर आणि फेसबुकचा यावेळी उल्लेख केला.

यावेळी बोलताना, 'मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे,' असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचे वारंवार समोर आल्याचंही त्यांनी सांगितले. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याचे आवाहन केले. सोनिया गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला असता काँग्रेस सदस्यांनी नाकारला.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...