Wednesday, March 16, 2022

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

 १७ वर्षांनी समस्या मार्गी ; आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा


ठाणे (प्रतिनिधी ) : मध्य वैतरणा प्रकल्पातील  प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा आणि नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

मध्य वैतरणा प्रकल्पातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावाच्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांना  नुकसान भरपाई आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने १० मार्च २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. बेल्हारे यांच्या दालनात आमदार संजय केळकर आणि प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत बैठक झाली. 
मध्य वैतरणा प्रकल्पात येथील आदिवासींची जमीन आणि वडिलोपार्जित शेती संपादित केली गेली आहे. त्यातील अनेकांना मोबदला मिळाला, परंतु १९ प्रकल्पग्रस्तांना मोबादलमिळलेला नाही. गेल्या १७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची नोकरीत सामावून घेण्याची आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा आणि झाडीचा मोबदला मिळण्याची मागणी तसेच २००५ ते २०२१ या काळात शेती न झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रतिवर्षी एक लाख रुपये कृषी मंजुरीसाठी मागणी आहे. 

याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होऊन प्रथम नोकरीस पात्र असतील अशा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांना आवश्यक आणि प्रचलित कायद्याच्या आधारे आर्थिक निकसं भरपाई देण्यात यावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त ल बेल्हारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून तत्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सूचनाही बेल्हारे यांनी बैठकीत दिल्या.

गेले अनेक वर्षे या प्रकरणी जिल्हा स्तरापासून मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. मात्र आमदार संजय केळकर यांनी आमची व्यथा समजून घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांकडे मांडल्या आणि तत्काळ कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आमदार संजय केळकर आम्हाला न्याय मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.

या बैठकीत आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त बेल्हारे, महापालिका अधिकारी गायकवाड तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे, काथोड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...