Sunday, March 20, 2022

देशात आपणच तारणहार असल्याचा देखावा सुरुमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कश्मीर फाईल चित्रपटावरून भाजपवर निशाणा

देशात आपणच तारणहार असल्याचा देखावा सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कश्मीर फाईल चित्रपटावरून भाजपवर निशाणा

मुंबई :राज्यात आणि देशात कश्मीर फाईल या चित्रपटावरुन वातावरण तापले असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? काहीच नाही. चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. “सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.
     पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी कोणाच्या काळात झाल्या. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. त्यावेळीही यावरुन टीका झाली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक हे सर्व आम्ही पाहत आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. आपण केलेली कामं जनतेसमोर मांडणं, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणं, विरोधकांवर आरोप करणं आणि अफवा पसरवणं या चार फळ्या होत्या आणि भाजपा यावर पावलं टाकत आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणं आणि आपणच तारणहार आहोत हे बिंबवणं झालं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...