Saturday, March 19, 2022

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

मुंबई - महाराष्ट्रात होळीनंतर राजकीय धुळवडीला सुरूवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकतेच भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

या भेटीनंतर राज्यात सत्तेच्या घडामोडी घडतायेत का? अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं राज्यात खळबळ उडाली. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असं मला माहित आहे किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल. संपर्कात असतील तर घ्या ना, थांबला कशाला होळी संपली आहे. कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही. आम्ही असं बोललो तर भाजपाचे(BJP) ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

राज्यातील मतदारांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरुण घेतलं आहे. त्यामुळे आता ते हिरव्याचं समर्थन करतात. भगव्याचं समर्थन करत नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले २५ आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. निवडणुका जवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येते. नाव सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल असंही रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) म्हणाले.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...