Saturday, February 26, 2022
अर्थशक्तीसाठी सहकार हा उपाय -डॉ. मोहन भागवत ‘टीजेएसबी’ सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रमठाणे : पैसा असो किंवा सत्ता असो, तो जितका एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चितता कमी होते. वाईटच होईल असे नाही तर चांगलेही होऊ शकेल. ते करणाऱ्यावर अवलंबून असते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्याकडे सत्ता आणि पैशाला विकेंद्रित स्वरूपात वाटण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीसाठी सहकार हा उपाय आहे. अर्थशक्ती काही हातात केंद्रित होण्यापेक्षा ती हळूहळू सर्वसामान्य माणसांच्या हातात येईल, या दिशेकडे तिला चलित करण्यासाठी सहकार चळवळ आहे, असेही ते म्हणाले.ठाण्यातील तीन हात नाका येथील टिप-टॉप प्लाझा सभागृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘टीजेएसबी’ सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. भागवत हे बोलत होते.भारतात सहकार क्षेत्र हे पूर्वीपासूनच आहे. परंतु सगळय़ाच गोष्टींचे मूळ विदेशात असल्याचे दाखविण्याची एक प्रचलित फॅशन आहे. यातूनच अमेरिकेत सहकार चळवळीचा उदय झाला असे सांगितले
Friday, February 25, 2022
Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी,
ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गारठाणे
Russia Ukraine War: भारत कुणासोबत?
Wednesday, February 23, 2022
केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांवर सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास
सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला,
Wednesday, October 13, 2021
दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक
नांदेड : स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून भक्तांना गंडवणाऱ्या बाबाला नांदेड (Nanded)मध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात हा भोंदूबाबा तरबेज होता.
नांदेड जिल्ह्यातील माहूर (Mahur) येथे कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले (Fake baba kapile maharaj) या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Fake godman vishwajeet kapile arrest) या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बाबासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला.
भोंदूबाबासह तीन जणांना माहूर पोलिसांनी अटक केली आहे. मागील तीन वर्षांपासून माहूर येथे टीनशेट उभारून या भोंदूबाबाने अघोरी कृत्य सुरू केले. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे यासाठीच दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे.
यज्ञ करून त्याची राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता. त्यासाठी भक्तांकडून बाबाने लाखो रुपये उकळले. डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल 24 लाख रुपयांचा गंडा घातला.
तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली. शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली. त्यांनंतर त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विश्वजित कपिले याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केला.
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...

-
नवी दिल्ली । कोरोनामुळे, जेथे 2020 मध्ये घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी गाड्या पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या, दुसरीकडे, मध्य रेल्वेने याच ...
-
नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसुली थकबाकी भरण्यासाठी 4 वर्षांची स्थगिती देण्यात आली आह...
-
मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचाल...