Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी, अन्...
कीव - रशियानं लष्करी हल्ला केल्यानं यूक्रेन सध्या संकटात सापडला आहे. त्यातच अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी सैन्य पाठवण्यास नकार दिल्याने यूक्रेनसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
त्यात यूक्रेननं कीवच्या बाहेरील एअरपोर्ट पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता १८-६० वयोगटातील सर्व पुरुषांना देशाबाहेर जाण्याची बंदी घातली आहे.
यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी देशातील आपत्कालीन स्थितीमुळे सक्तीची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. ६० हजार सैन्य देशाच्या रक्षणासाठी तैनात असल्याचं यूक्रेननं सांगितले आहे. पुतिन यांनी यूक्रेनच्या सीमेवर जवळपास १ लाख ९० हजार सैनिक पाठवले आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दोन्ही देशातील युद्धात आतापर्यंत १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. यूक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने आरोग्य सुविधा सज्ज करण्याचे आदेश दिलेत. जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीत जखमी लोकांना आणि सैन्यांना तात्काळ आवश्यक उपचार दिले जातील.
No comments:
Post a Comment