Tuesday, September 14, 2021

मोदींच्या स्वप्नाला पालघरकरांचं बळ, बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यास 12 गावे तयार


पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नांना पालघरकरांनी बळ दिलं आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यास पालघरमधील 12 गावांनी संमती दर्शवली आहे.

गावांनी संमती दर्शविताच या जमिनीचं संपादन करण्यात आलं असून बुलेट ट्रेनचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. (12 villages in Palghar decide to give up land for bullet train project)



मोदी सरकारच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मागील महिनाभरात 12 पेसा गावांनी जमीन देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी दिली आहे. मागील महिन्यात 12 पेसा गावांतील (अनुसूचित क्षेत्र) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आतापर्यंत 19 पेसा गावांनी बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा ठराव मंजूर केला आहे. अजूनही 10 पेसा गावांची ठराव व जमीन भूसंपदानाबाबत मंजुरी येण्याचं बाकी असल्याचं यावेळी सांगितले आहे. तसेच आतापर्यत चर्चा केलेल्या 31 गावांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दाखवली आहे, असे जिल्हा भूसंपादन अधिकारी संदीप पवार यांनी म्हटलं आहे.


बुलेट ट्रेनला आक्षेप का?


अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आणि केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचा आरोप आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात तर उर्वरीत 8 स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा असेल, असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे.

Saturday, September 11, 2021

मुंबईतील बलात्कार पीडित महिलेचा अखेर मृत्यू ; देशभरातून संताप

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा पाशवी प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे.



साकीनाका परिसरातील घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. शुक्रवारी मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.


साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. महिलेवर उपचार सुरु होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरु असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला.

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह


नवी दिल्ली | तालिबाननं पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर आता त्यांचा पूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व झालं आहे. यानंतर आता तालिबाननं अफगाणिस्तानमधे नवीन सरकार स्थापन करणाऱ्याची घोषणा केली.

अशातच आता तालिबानच्या विजयानंतर भारताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

आता भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षण मंत्री पीटर डटन यांच्याशी तालिबाननं माजवलेल्या दहशतीविषयी बोलताना भारताविषयी चिंता व्यक्त केली आहे. तालिबान सध्या जगासमोर आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे.


भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, अफगाणिस्तानमधील जमिनीचा वापर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन 2593 लागू करण्यात यावं, असं त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला म्हटलं आहे.


दरम्यान, तालिबाननं नवीन सरकार स्थापन केल्यानंतर 6 देशांना आमंत्रण पाठवलं. तालिबानच्या ताब्यामुळे दहशतवाद्यांचं मनोबल वाढेल म्हणून भारताची चिंता सध्या वाढली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!


मुंबई : Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.



खुद्द विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. गुजरातच्या जनतेनं आजवर दाखवलेल्या विश्वासाचे आणि भाजपाचे आभार व्यक्त करतो. माझ्या राजीनाम्यामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी व जबाबदारी मिळेल, असं रुपाणी यांनी यावेळी म्हटलं आहे.


विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय रुपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आजवर केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार व्यक्त केले. तसेच जनतेनं आजवर दिलेल्या प्रेमाचा कायमस्वरुपी ऋणी राहीन असंही रुपाणी म्हणाले. कोविड काळात माझ्या नेतृत्त्वात आम्ही राज्यात दिवसरात्र काम करुन नागरिकांची सेवा केली याचं समाधान असल्याचंही ते म्हणाले. यापुढील काळात पक्षाच्या कामात स्वत:ला व्यग्र ठेवण्याची इच्छाही रुपाणी यांनी बोलून दाखवली आहे.

Thursday, September 9, 2021

अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना बुक्टूकडून मदतीचा हात; अनेकांचे शुल्क भरले तर कोणाला दिले साहित्य

 

मुंबई, ता. 9:

 कोकणात जुलै महिन्यात आलेल्या महापुरात चिपळूण, महाड परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यासाठी तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तर कर्मचारी वर्गासाठी इतर प्रकारच्या मदतीसाठी बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन तथा बुक्टू या प्राध्यापक संघटनेने मदतीचा हात दिला आहे.



बुक्टूने डिबीजे महाविद्यालय, चिपळूण येथील 150 विद्यार्थ्यांची 1 लाख 20 हजार रुपयांची प्रवेश फी भरली आहे. सोबत पोलाडपुर  येथील  सुंदरराव मोरे महाविद्यालय, 109 विद्यार्थ्यांची .87 हजार,200 रुपयांची फी संघटनेने भरली आहे. 

ज्या महाड परिसरात महापुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले त्या परिसरात असलेल्या  डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथील 150 विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या विविध अभ्यासक्रमाची 1 लाख 20 हजार रुपयांची प्रवेश  फी भरली असल्याची माहिती बुक्टू च्या अध्यक्ष डॉ. तपती मुखोपाध्याय यांनी दिली. तसेच याच परिसरात तब्बल 560 विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध  करून देण्यात आल्याची माहितीही मुखोपाध्याय यांनी दिली.

मुंबईत १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी घेतले निर्णय

 मुंबई - मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश मुंबई पोलिसांनी यांनी जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत असे आदेश लागू केले आहेत.

यासंदर्भातील सूचना मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.



कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही प्रादुर्भावाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत. पालिकेने गेल्या वर्षी सार्वजनिक मंडळांना जे नियम घातले होते, ते सर्व नियम यावर्षीही लागू करण्यात आले आहेत. पण तरीही प्रशासनाने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशमूर्ती आणणाऱ्यांकरिता ही नियमावली बंधनकारक असणार आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.

बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहरमामा भोसलेंवर गुन्हा दाखल

Mumbai :बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव करत फसवणूक करणाऱ्या मनोहरमामा भोसलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सरची बादा झाली होती. त्यावर उपाय करण्याच्या बहाण्याने मनोहर भोसलेने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केले आहे.



त्यानंतर महाराष्ट्र नरबळी, आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ठ प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांविरोधात बारामती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोहरमामासह विशाल वाघमारे (उर्फ नाथबाबा) ओमकार शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, मनोहरमामा भोसले यांच्यासह इतर दोघांविरोधात बारामती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत खरात यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सरची बाधा झाली आहे. हा कॅन्सर आजार मनोहरमामा भोसलेंनी बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून बरा करतो असे भासवले. यावेळी औषधोपचार म्हणून मनोहरमामाने वेळोवेळी त्यांना बाभळीचा पाला, भस्म खायला दिले. आणि उपचारांसाठी मनोहरमामाने आत्तापर्यंत २ लाख ५१ हजार रुपये या खरात कुटुंबियांकडून वसूल केले.


स्वत:ला आदमापूरच्या संत बाळूमामांचा वंशज, अवतार म्हणविणारा उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामाने आत्तापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. बाळूमामा आपल्याला प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात, असा मनोहर भोसले दावा करतो. बाळूमामांच्या नावाने पद्धतशीर खोटा प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली. त्यातून समस्याग्रस्त जनतेला संकट दूर करतो, असे सांगून जाळ्यात ओढले. मनोहर भोसले याच्या कारनाम्याला भुलून अनेक नामांकित नेत्यांनी उंदरगावात त्याच्यासमोर लोटांगण घातले.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...