मुंबई, ता. 9:
कोकणात जुलै महिन्यात आलेल्या महापुरात चिपळूण, महाड परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यासाठी तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तर कर्मचारी वर्गासाठी इतर प्रकारच्या मदतीसाठी बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन तथा बुक्टू या प्राध्यापक संघटनेने मदतीचा हात दिला आहे.
बुक्टूने डिबीजे महाविद्यालय, चिपळूण येथील 150 विद्यार्थ्यांची 1 लाख 20 हजार रुपयांची प्रवेश फी भरली आहे. सोबत पोलाडपुर येथील सुंदरराव मोरे महाविद्यालय, 109 विद्यार्थ्यांची .87 हजार,200 रुपयांची फी संघटनेने भरली आहे.
ज्या महाड परिसरात महापुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले त्या परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथील 150 विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या विविध अभ्यासक्रमाची 1 लाख 20 हजार रुपयांची प्रवेश फी भरली असल्याची माहिती बुक्टू च्या अध्यक्ष डॉ. तपती मुखोपाध्याय यांनी दिली. तसेच याच परिसरात तब्बल 560 विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही मुखोपाध्याय यांनी दिली.
No comments:
Post a Comment