Mumbai :बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव करत फसवणूक करणाऱ्या मनोहरमामा भोसलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सरची बादा झाली होती. त्यावर उपाय करण्याच्या बहाण्याने मनोहर भोसलेने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केले आहे.
त्यानंतर महाराष्ट्र नरबळी, आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ठ प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांविरोधात बारामती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोहरमामासह विशाल वाघमारे (उर्फ नाथबाबा) ओमकार शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, मनोहरमामा भोसले यांच्यासह इतर दोघांविरोधात बारामती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत खरात यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सरची बाधा झाली आहे. हा कॅन्सर आजार मनोहरमामा भोसलेंनी बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून बरा करतो असे भासवले. यावेळी औषधोपचार म्हणून मनोहरमामाने वेळोवेळी त्यांना बाभळीचा पाला, भस्म खायला दिले. आणि उपचारांसाठी मनोहरमामाने आत्तापर्यंत २ लाख ५१ हजार रुपये या खरात कुटुंबियांकडून वसूल केले.
स्वत:ला आदमापूरच्या संत बाळूमामांचा वंशज, अवतार म्हणविणारा उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामाने आत्तापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. बाळूमामा आपल्याला प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात, असा मनोहर भोसले दावा करतो. बाळूमामांच्या नावाने पद्धतशीर खोटा प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली. त्यातून समस्याग्रस्त जनतेला संकट दूर करतो, असे सांगून जाळ्यात ओढले. मनोहर भोसले याच्या कारनाम्याला भुलून अनेक नामांकित नेत्यांनी उंदरगावात त्याच्यासमोर लोटांगण घातले.
No comments:
Post a Comment