Tuesday, September 14, 2021

मोदींच्या स्वप्नाला पालघरकरांचं बळ, बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यास 12 गावे तयार


पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नांना पालघरकरांनी बळ दिलं आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन देण्यास पालघरमधील 12 गावांनी संमती दर्शवली आहे.

गावांनी संमती दर्शविताच या जमिनीचं संपादन करण्यात आलं असून बुलेट ट्रेनचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. (12 villages in Palghar decide to give up land for bullet train project)



मोदी सरकारच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मागील महिनाभरात 12 पेसा गावांनी जमीन देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी दिली आहे. मागील महिन्यात 12 पेसा गावांतील (अनुसूचित क्षेत्र) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आतापर्यंत 19 पेसा गावांनी बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा ठराव मंजूर केला आहे. अजूनही 10 पेसा गावांची ठराव व जमीन भूसंपदानाबाबत मंजुरी येण्याचं बाकी असल्याचं यावेळी सांगितले आहे. तसेच आतापर्यत चर्चा केलेल्या 31 गावांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दाखवली आहे, असे जिल्हा भूसंपादन अधिकारी संदीप पवार यांनी म्हटलं आहे.


बुलेट ट्रेनला आक्षेप का?


अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आणि केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचा आरोप आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात तर उर्वरीत 8 स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा असेल, असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...