ऑनलाईन क्लासेच तुमच्या चिमुकल्यांवर पडतायत भारी, 'या' समस्यांचे प्रमाण वाढले- तज्ज्ञ
मुंबई : कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांच्या अनेक अडचणी वाढल्या. चुकीच्या पद्धतीनं (Posture) बसल्यामुळं लहान मुलांमध्ये मान आणि पाठदुखीचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रुग्णालयात मुलांना भेडसावणार्या समस्यांशी संबंधित प्रकरणांपैकी ५० टक्के समस्या ऑनलाइन क्लासेसद्वारे वाढल्या आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या वृत्तात, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन (Orthopedic and Robotic Joint Replacement Surgeon) आणि एनएचएस हॉस्पिटल, जालंधरचे संचालक शुभांग अग्रवाल यांनी सांगितले की, 'स्क्रीनसमोर असताना चुकीच्या स्थितीत बसणे आणि या काळात कमी झालेल्या शारीरिक हालचालींमुळे मुले मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहेत, तसेच बहुतेक मुलांचे वजन वाढले असल्याचेही दिसून येत आहे. त्यांची सहनशक्ती कमी झाल्याचेही दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये स्ट्रेसही वाढला आहे आणि त्यांचं मन वारंवार विचलित (Neck and Back lodged Due to Online Class) होत आहे.
इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटर, दिल्ली येथील बालरोग आर्थोपेडिक सल्लागार (Pediatric Orthopedic Consultant) डॉ. सुरभीत रस्तोगी यांच्या मते, अलिकडे मुलांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते एवढा वेळ घरात चुकीच्या पद्धतीनं बसत आहेत, मुलांचे सूर्यप्रकाशात बाहेर पडणे बंद झाले आहे. जास्त वेळ स्क्रीनवर घालवणाऱ्यांनी खबरदारी म्हणून काही उपाय अवलंबले पाहिजेत. कॅल्शियम युक्त आहाराप्रमाणे, सूर्यप्रकाश घेणे, दर अर्ध्या तासाने ब्रेक घेणे. याशिवाय मुलांना दररोज इनडोअर किंवा आउटडोअर अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा लागेल, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावे लागतील आणि पाठीचा योग्य आधार घेऊन खुर्चीवर बसावे लागेल.
ऑनलाइन क्लासमध्येच स्ट्रेचिंग व्यायाम
डॉ. रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, जे शिक्षक मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेत आहेत, त्यांनी मुलांना ५ मिनिटांच्या काही मजेशीर स्ट्रेचिंग अॅक्टिव्हिटी करायला लावाव्यात. १० मिनिटे बसल्यानंतर मुलांना एकदा इकडे तिकडे उभे करून स्ट्रेचिंग प्रकार करवून घ्या. त्यामुळे मुले निरोगी राहतील.
वेदना हलक्यात घेऊ नका
ऑर्थोपेडिक सर्जन, उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटल आग्रा येथील डॉ. विशाल गुप्ता म्हणतात, "जेव्हा मुले पाठदुखीची तक्रार करतात, तेव्हा अनेक वेळा गंभीर कारण असते, मग ते दुखापत, संसर्ग किंवा ट्यूमर असू शकतो. त्याला तातडीने रुग्णालयात नेवून तपासणी केली पाहिजे.