स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपचे दर वाढणार; पाहा काय आहे कारण
नवी दिल्ली : चीनमध्ये काही दिवसांनंतर पुन्हा कोरोना (Coronavirus) वाढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा थेट परिणाम स्मार्टफोन (Smartphone) , स्मार्ट टीव्ही (TV) , लॅपटॉपसारख्या (Laptop) इलेक्ट्रिक सामानाच्या किमतीवर दिसू लागला आहे.
कोरोनामुळे चीनमधील अनेक शहरांत पुन्हा लॉकडाउन लावण्यात आला आहे. चीनमधील टेक हब शेनझेन (China's Shenzhen) भागात कोरोनाच्या वाढत्या केसेसनंतर लॉकडाउनमुळे टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात. चीनमधील हा भाग जगातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा (Electronics Products) सर्वात मोठा पुरवठादार आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनचे (International Data Corporation- IDC) संशोधक संचालक नवकेंद्र सिंग यांच्या मते, भारतातील इलेक्ट्रॉनिक घटकांचा पुरवठा 20 ते 50 टक्के चीनच्या शेनझेनमधून होतो. कोरोनो संसर्ग आणि लॉकडाउनसारखी परिस्थिती पुन्हा उद्धवली तर त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर होऊ शकतो. उत्पादनांच्या किमती वाढत असून वाढत्या किमतीचा बोजा थेट ग्राहकांवर पडू शकतो. शेनझेन शहरातील लॉकडाउन तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्यास जून तिमाही तसंच सप्टेंबर तिमाहीमध्ये स्मार्टफोन आणि पर्सनल कंप्यूटरच्या शिपमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
काउंटरपॉइंट रिसर्चचे (Counterpoint Research) संशोधक संचालक तरुण पाठक यांनी सांगितलं, की जर लॉकडाउन 20 मार्चच्या पुढे वाढला तर किमती वाढू शकतात. स्मार्टफोनच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात. उत्पादनांच्या किमती आणि मालवाहतुकीचे दर गेल्या एका वर्षात वाढले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे अनेक ब्रँड नव्या किमतीचा दबाव सहन करू शकत नाही आणि हा दबाव ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. कोरोना संसर्ग अधिक वाढला तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. याआधीच कंपन्या महागाईच्या वाढत्या दबावाखाली असून त्यात पुन्हा दर वाढल्याचा त्याचा परिणाम ग्राहकांवर होऊ शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
No comments:
Post a Comment