Thursday, March 17, 2022

आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबईः 1990च्या काश्मीर नरसंहारावर आधारित 'द कश्मीर फाईल्स'(The Kashmir Files) चित्रपटावरुन बराच रोजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.

महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभेत केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''द कश्मीर फईल्स' काय घेऊन बसलात? आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही 'ठाकरे' हा सिनेमादेखील महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. अशाप्रकारची मागणीही कधी केली नाही,'' असं संजय राऊत म्हणाले.

'द काश्मीर फईल्स' चित्रपटावरुन सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत बोलताना 'मिशन मंगल', 'तानाजी', 'पानिपत' हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करुन दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हा चित्रपट करमुक्त करावा, असे म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?
विधानसभेत अजित पवारांनी भाजपची कोंडी केली, तर आज संजय राऊतांनीही भाजपला घेरले. ''आता त्यांना काश्मीर आठवले आहे. नरेंद्र मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरुन राजकारण करू नये,'' असे राऊत म्हणाले.

'बाळासाहेबांनी काश्मीरसाठी खूप काही केलं'
राऊत पुढे म्हणतात की, ''काश्मीर प्रकरणावर आम्ही कधीच राजकारण केले नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते, तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी देणारे बाळासाहेब पहिले नेते होते. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के राखीव जागा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. पण आम्ही चित्रपट काढून प्रचार केला नाही, राजकारण केले नाही. त्यामुळे कोणत्या विषयाचे राजकारण करायचे त्याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे,'' अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Wednesday, March 16, 2022

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि नुकसान भरपाई मिळणार...

 १७ वर्षांनी समस्या मार्गी ; आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा


ठाणे (प्रतिनिधी ) : मध्य वैतरणा प्रकल्पातील  प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा आणि नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

मध्य वैतरणा प्रकल्पातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावाच्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांना  नुकसान भरपाई आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने १० मार्च २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. बेल्हारे यांच्या दालनात आमदार संजय केळकर आणि प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत बैठक झाली. 
मध्य वैतरणा प्रकल्पात येथील आदिवासींची जमीन आणि वडिलोपार्जित शेती संपादित केली गेली आहे. त्यातील अनेकांना मोबदला मिळाला, परंतु १९ प्रकल्पग्रस्तांना मोबादलमिळलेला नाही. गेल्या १७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची नोकरीत सामावून घेण्याची आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा आणि झाडीचा मोबदला मिळण्याची मागणी तसेच २००५ ते २०२१ या काळात शेती न झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रतिवर्षी एक लाख रुपये कृषी मंजुरीसाठी मागणी आहे. 

याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होऊन प्रथम नोकरीस पात्र असतील अशा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांना आवश्यक आणि प्रचलित कायद्याच्या आधारे आर्थिक निकसं भरपाई देण्यात यावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त ल बेल्हारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून तत्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सूचनाही बेल्हारे यांनी बैठकीत दिल्या.

गेले अनेक वर्षे या प्रकरणी जिल्हा स्तरापासून मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. मात्र आमदार संजय केळकर यांनी आमची व्यथा समजून घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांकडे मांडल्या आणि तत्काळ कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आमदार संजय केळकर आम्हाला न्याय मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.

या बैठकीत आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त बेल्हारे, महापालिका अधिकारी गायकवाड तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे, काथोड आदी उपस्थित होते.

सोनिया गांधी म्हणाल्या,"राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्करपणे होतोय वापर

सोनिया गांधी म्हणाल्या,"राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्करपणे होतोय वापर"

नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीनंतर पाहिल्याचं काँग्रेसच्या हंगामीअध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपले निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी देशात सोशल मीडियाच्या होत असलेल्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त करत राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत ट्वीटर आणि फेसबुकचा यावेळी उल्लेख केला.

यावेळी बोलताना, 'मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे,' असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचे वारंवार समोर आल्याचंही त्यांनी सांगितले. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याचे आवाहन केले. सोनिया गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला असता काँग्रेस सदस्यांनी नाकारला.

Tuesday, March 15, 2022

ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्व सॅटिस २ च्या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून द्या ! खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत शून्य प्रहर

ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्व सॅटिस २ च्या कामासाठी लागणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून द्या ! खासदार राजन विचारे यांचा लोकसभेत शून्य प्रहर

प्रतिनिधी -ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे रेल्वे स्थानकात कोपरी पूर्व येथे ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत मल्टी मॉडल ट्रान्झिट हब या रेल्वेच्या वाणिज्य उपयोगाकरिता ८ मजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. या कामास लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागू नये व काम वेळेत पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून खासदार राजन विचारे यांनी सुरू असणाऱ्या लोकसभेच्या आर्थिक अधिवेशनात शून्य प्रहर मार्गे मुद्दा उपस्थित केला यामध्ये त्यांनी या प्रकल्पासाठी २६० कोटी रुपये खर्च होणार असून त्यामध्ये ५०%  ठाणे स्मार्ट सिटी तर २५% टक्के राज्य सरकार व ठाणे महापालिका २५% असा खर्च करणार आहे

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला, २.४ किलोमीटर लांबीचा उन्नत बस मार्ग आणि ८००० चौरस मीटर उन्नत बस डेक ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड बांधत आहे. आणि भविष्यात १६,००० चौरस मीटरची व्यावसायिक इमारत बांधली जाणार आहे. सुधारित बस डेकच्या वर मध्य रेल्वे. बांधणार, ज्याचा रेल्वेला फायदा होईल.

या प्रकल्पात ११० कार आणि १३० दुचाकींसाठी पार्किंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. उन्नत केलेल्या बस डेकचा वापर सार्वजनिक वाहतूक आणि इतर सुविधांच्या देवाणघेवाणीसाठी केला जाईल. सॅटिस बांधल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना बस पकडणे सोपे होणार आहे.

 या प्रकल्पाचे ४२% काम पूर्ण झाले असून ३९% रक्कमही प्राप्त झाली असून, हा प्रकल्प २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने प्रकल्पाचे उर्वरित काम वेळेत पूर्ण करावे आणि प्रकल्पासाठी ५०% निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी माननीय रेल्वेमंत्र्यांना सभागृहात केली. तसेच या प्रकल्पाशी संबंधित अडथळे लवकरात लवकर दूर करण्यासाठी संबंधित मध्य रेल्वे विभागाला आवश्यक लागणाऱ्या परवानग्या वेळेत देण्याचे निर्देश. द्यावे अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.

Monday, March 14, 2022

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय महत्वाचं? जाणून घ्या माहिती

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय महत्वाचं? जाणून घ्या माहिती

मुंबई : सध्या लोकांना त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढणे किंवा जाड होण्याच्या समस्या लोकांना भेडसावू लागले आहेत. अशात अनेक लोक आपलं वजन कमी करण्यासाठी हेल्दी जेवण किंवा जेवण कमी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी भात कमी खावं की, चपाती? बरेच लोक वजन कमी करताना प्रथम चपाती खेणं सोडून देतात आणि नंतर काही तासांतच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. आता भारतीय अन्नाचा विचार केला, तर भात आणि रोटी हे दोन्ही मुख्य पदार्थ आहेत, जे कार्बोहायड्रेट देतात.
आता अशा परिस्थितीत दोन्हीपैकी एक सोडणे कठीण होऊ शकते. भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात. त्याच वेळी, मधुमेह असलेल्या लोकांनी काय करावं असा देखील लोकांना प्रश्न पडतो.
तांदूळ आणि गहू ही दोन्ही तृणधान्ये आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण असते. ते किती असते ते जाणून घेऊया.

अहवालानुसार, 100 ग्रॅम गव्हाच्या पिठात
76 ग्रॅम कर्बोदक
10 ग्रॅम प्रथिने
1 ग्रॅम चरबी

अहवालानुसार, 100 ग्रॅम तांदळात
28 ग्रॅम कर्बोदक
2.7 ग्रॅम प्रथिने
0.3  ग्रॅम चरबी

मुख्यमंत्री योगी यांची जागा मंदिर आणि मठात, राजकारणात नाही"; प्रणिती शिंदे

मुख्यमंत्री योगी यांची जागा मंदिर आणि मठात, राजकारणात नाही"; प्रणिती शिंदे 

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदेंनी योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर देशाचे वाटोळे होते, असे म्हणत आदित्यनाथांवर सडकून टीका केली आहे.

'उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिली. ७०० शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि मग कायदे मागे घेतले.' असा टोला प्रणिती शिंदेंनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकावर टीका करताना लगावला आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना प्रणिती यांनी योगी आणि महाराजांची जागा मठांमध्ये आणि मदिरांमध्ये आहे असे म्हणत टोला लगावला आहे.

'योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं स्थान आहे मंदिरामध्ये आणि मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरु होतं,' असे त्या भाषणात म्हणाल्या. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.

काम पाहून मतदान केलं पाहिजे असंही प्रणिती यांनी म्हटलंय. 'जे काम करतात त्यांना मतदान करणं महत्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्व द्या,' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना भाषणादरम्यान केले.

लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे : संजय राऊत

लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी-विरोधकांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे : संजय राऊत 

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांना टार्गेट दिले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच जरी गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना म्हटले गेले असले, तरी गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथे व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असेही राऊत म्हणाले आहेत. त्यासोबतच राऊतांनी शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, गोव्यात भाजपच नव्हे, तर कोणीही असले तरी वाद निर्माण होतो. कोणीही गोव्यात निवडणुका जिंकल्याचा टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. गोव्याच्या विजयाचे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस शिल्पकार असल्यामुळे भाजप कार्यालयात त्यांचे मोठे स्वागत झाले, ढोल वाजवले, लेझीम खेळले. त्यांचे विधानभवनातही मोठे स्वागत झाले. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकारबरोबर हातात हात घालून राज्याचे आणि देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणे हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचे असते. पण गेल्या सात-आठ वर्षांपासून दुर्दैवाने हे पाहायला मिळत नाही. म्हणजे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यांचे एकमेकांशी पराकोटीचे वैर आहे, कौरव-पांडवांचे महाभारत आहे, अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही. पण आमचा राष्ट्राच्या, सुरक्षेच्या, आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचे कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न राहिल.

निवडणुकांपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात. जसा हिजाबचा मुद्दा होता. या मुद्द्यांनी निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत. अलिकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण भर देतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात. निवडणुका झाल्यानंतर विकासावर बोलायला सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यावर येतात. आता देशाला सवय झाली आहे आणि लोकही गंगेत जशी प्रेते वाहून गेली, त्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहेत. देशासाठी हे चित्र चांगले नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप चार राज्यात जिंकला आहे, एका राज्यात आप जिंकली आहे. हा विजयाचा उन्माद अजीर्ण होऊ नये. हा विजय सत्कारणी लागावा, एवढेच आम्ही म्हणून शकतो. या देशात विरोधी पक्ष राहणे ही या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...