Tuesday, August 17, 2021

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं.


120 भारतीय परतले


भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते.



गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.


जल्लोषात स्वागत


अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.

Monday, August 16, 2021

तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे.

या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. (malala yousafzai says we watch in complete shock as taliban take control of afghanistan)



तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार


अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिद्दीनसाठी हा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत, असे तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे. या एकूणच प्रकरणावर मलालाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवरून मांडली आहे.



आम्हाला प्रचंड धक्का बसला


तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्याचे बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालावे अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावे, असे ट्विट मलालाने केले आहे.



'शांततापूर्ण हस्तांतर' करावे असे आवाहन

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे 'शांततापूर्ण हस्तांतर' करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले होते. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत. तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका, असे आदेश तालिबानींना देण्यात आले आहेत.


दरम्यान, मलालाने देखील तालिबानशी दीर्घकाळ वैचारिक संघर्ष केला आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानातील तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसानने मलालावर गोळी झाडली होती. त्यानंतर मलालाच्या संघर्षाला अधिक धार आली. २४ वर्षीय मलालाला २०१४ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. तिला नोबेल पुरस्कार देण्यात आले, त्यावेळी तिचे वय अवघे १७ वर्षे होते.

बृहन्मुंबई क्षेत्रातील उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे नागरिकांसाठी खुले




मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 'ब्रेक दि चेन' अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. मुंबई महानगरातील कोविड-19 संसर्गस्थिती सध्या नियंत्रणात आहे.



केंदीय मंत्री ना.कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा



ठाणे, प्रतिनिधी :- 


          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाणे जिल्हा भाजपामय बनला आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीने मंत्री कपिल पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ठाण्याच्या वेशीवरून जन यात्रेला जोरदार सुरुवात झाली. ठाण्याचे नगरसेवक भरत चव्हाण आणि संजय वाघुले यांनी ना.कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत केले असून पारंपारिक वेशभुषेतील आगरी कोळी बांधवांनी कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून ना. कपिल पाटील यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांनी कपिल पाटील यांना आशिर्वाद दिला..



           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश केला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार या दिग्गज मंडळीच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवार १६ ऑगस्टपासून प्रारंभ झाला.ठाणे, आनंदनगर चेकनाक्यावर कोपरीचे एकमेव भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी ना.कपिल पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.संपूर्ण पूर्वद्रुतगती महामार्गासह परिसर भाजपमय बनला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, संजीव नाईक, भाजपचे नेते कृपाशंकर सिंग, या कार्यक्रमाचे आयोजक भरत चव्हाण, संजय वाघुले, ओमकार चव्हाण, वृषाली वाघुले, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


           सोमवारी पहिल्या दिवशी जनआशिर्वाद यात्रा ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल.


चौकट 


जिल्याला मंत्रिपद देऊन मोदींनी ठाणे जिल्याचा वनवास संपवला - कपिल पाटील


       ठाणे जिल्ह्याला केंद्रात मंत्री पद दिले हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद देऊन जिल्ह्याचा वनवास संपवला आहे. 

मंत्री झाल्यानंतर जनतेचा आशीर्वाद घ्या कामाला सुरुवात करा अशी मोदी यांनी सांगितल्या नंतर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. ही अभिमानाची गोस्ट असून हे माझे स्वागत नाही तर मोदींच्या विचारला सलाम आहे. मला मोदींनी  विकास कामे करण्यासाठी संधी दिली, मला जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पूर्ण करणार असून याआधी भरकटलेल्या मार्गाचे चालत होतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिशा दिली असून भारतीय जनता पार्टी माझे कुटूंब म्हणून मी काम करून दाखवेन. 

कपिल पाटील ( केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री)

Friday, August 13, 2021

१२ आमदारांचा प्रस्ताव राज्यपालांना दीर्घकाळ प्रलंबित ठेवता येणार नाही - हायकोर्ट



राज्यपालांना कोणताही आदेश देणार नाही, असे स्पष्ट करताना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबतचा प्रस्ताव दिर्घकाळ प्रलंबित ठेवता येणार नसल्याची टिप्पणी मुंबई हायकोर्टाने गुरुवारी केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने आपले मत स्पष्ट केले. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. मात्र, मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत. राज्यपालांनी १२ आमदारांचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळावा अथवा तो संमत करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या



Mumbai : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बुधवारी ११ ऑगस्टला रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने तपासणी करीत संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवला आहे.



छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या. गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केलं.

सीआयएसएफला पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्या फेकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्या बाजूला केल्या. या घटनेने विमानतळावरील कामकाज किंवा उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही. सीआयएसएफने याबाबत स्थानिक पोलिसांना पाचारण केलं. त्यांनी संरक्षक भिंत परिसर आणि झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनही संशयितांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. दिल्लीनंतर मुंबई देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. दरम्यान, येत्या १५ ऑगस्टला ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाली आहे.

चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल



मुंबई : एकात्मिक बाल योजनेअंतर्गत मुलांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे वाटप करणाऱ्या खासगी पुरवठादारांवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केला.


या घोटाळ्याची चौकशी करावी, यासाठी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात काही जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या चिक्कीचे आणि मुलांशी संबंधित वस्तूंचे कंत्राट काही ठरावीक कंत्राटदारांना प्रक्रिया पार न पाडताच दिले असल्याचा आरोप त्यात आहे. गुरुवारी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, निकृष्ट दर्जाची चिक्की मुलांना वाटली.



त्यात वाळू असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. अशी कोट्यवधी रुपयांची २४ कंत्राटे देण्यात आली होती. २०१५ मध्येच कंत्राटांना व कंत्राटदारांचे पैसे देण्यास स्थगिती देण्यात आली.

'सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन करून ही कंत्राटे देण्यात आली होती का? नियम पाळले होते का? ही कंत्राटे बेकायदेशीर होती की कंत्राटदार अपात्र होते? हे आम्हाला सांगा. तेव्हाच आम्ही कंत्राटदाराने पुरविलेल्या वस्तू निकृष्ट होत्या की नव्हत्या, या प्रश्नाकडे वळू. अन्नात भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला का?, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...