नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे.
या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. (malala yousafzai says we watch in complete shock as taliban take control of afghanistan)
तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार
अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिद्दीनसाठी हा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत, असे तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे. या एकूणच प्रकरणावर मलालाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवरून मांडली आहे.
आम्हाला प्रचंड धक्का बसला
तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्याचे बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालावे अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावे, असे ट्विट मलालाने केले आहे.
'शांततापूर्ण हस्तांतर' करावे असे आवाहन
अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे 'शांततापूर्ण हस्तांतर' करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले होते. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत. तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका, असे आदेश तालिबानींना देण्यात आले आहेत.
दरम्यान, मलालाने देखील तालिबानशी दीर्घकाळ वैचारिक संघर्ष केला आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानातील तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसानने मलालावर गोळी झाडली होती. त्यानंतर मलालाच्या संघर्षाला अधिक धार आली. २४ वर्षीय मलालाला २०१४ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. तिला नोबेल पुरस्कार देण्यात आले, त्यावेळी तिचे वय अवघे १७ वर्षे होते.
No comments:
Post a Comment