Friday, August 13, 2021

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या



Mumbai : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बुधवारी ११ ऑगस्टला रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने तपासणी करीत संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवला आहे.



छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या. गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केलं.

सीआयएसएफला पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्या फेकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्या बाजूला केल्या. या घटनेने विमानतळावरील कामकाज किंवा उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही. सीआयएसएफने याबाबत स्थानिक पोलिसांना पाचारण केलं. त्यांनी संरक्षक भिंत परिसर आणि झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनही संशयितांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. दिल्लीनंतर मुंबई देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. दरम्यान, येत्या १५ ऑगस्टला ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाली आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...