मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर विनामास्क प्रवाशांवर कारवाई सुरूच असून फेब्रुवारी 2021 पासून 29,356 विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मास्क परिधान करूनच प्रवासी प्रवास करीत आहेत. पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी 2021 पासून ते आतापर्यंत 17 हजार 702 तर मध्य रेल्वेने 11 हजार 654 विनामास्क प्रवाशांवर कारवाई केली आहे. फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेवर 4,017 विनामास्क प्रवासी आढळले होते. जून महिन्यात हीच संख्या 1,326 एवढी झाली. तर जुलै महिन्यात 943 प्रवाशांवर कारवाई झाली आहे. मध्य रेल्वेवर फेब्रुवारीत 4,800 आणि मार्च महिन्यात 5,200 हून अधिक विनामास्क प्रवासी पकडले होते.

No comments:
Post a Comment