Sunday, April 17, 2022

PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का

PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पर्याय आणि विरोधकांचा चेहरा म्हणून स्वत:ला पुढे करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी 13 विरोधी पक्षांनी देशातील बिघडलेल्या सांप्रदायिक परिस्थितीवर संयुक्त निवेदन जारी केले होते. या संयुक्त निवेदनात केसीआर यांचा समावेश नव्हता. तर, केसीआर समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षेला तडा गेला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, (Sonia Gandhi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सरदार शरद पवार (Sharad Pawar) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यासह १३ विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. यामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समितीशिवाय तेलगू देसम पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) यांचाही समावेश नव्हता.

विरोधकांच्या ऐक्यात पुन्हा फूट

तीन पक्ष वगळता 13 विरोधी पक्षांचे एकत्र येणे हे विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट म्हणून पाहिले जात आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून केसीआर वेगळे राहण्याचे संकेतही आहेत. तर, यापूर्वी केसीआर यांनीही भाजपशी लढण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याअंतर्गत त्यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली. फेब्रुवारीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला, जिथे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली.

विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केसीआर यांनी केवळ आपल्याच राज्यातच नव्हे तर इतर राज्यातही हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठिंबा दिल्याबद्दल आवाज उठवला होता.

काँग्रेसला सतत निवडणुका हरत आहे. असे असतानाही विरोधी पक्षात केवळ काँग्रेसच मोठा चेहरा असू शकतो, असे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सामावून घेतल्याशिवाय तिसरी आघाडी शक्य नसल्याचे सांगितले होते

Friday, April 15, 2022

मोठी बातमी! केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगितीनवी

मोठी बातमी! केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

खासदार कोट्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना स्थगिती देण्यात आली आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत खासदार कोटा बंद राहणार आहे. याबाबत समिती बनवून कोटा कायमस्वरुपी बंद करायचा का याबद्दल विचार होणार असल्याची देखील माहिती आहे.

आधी केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रत्येक खासदाराला 10 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शिफारस करता येत होती. यावरुन गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. या कोट्यावरून वाद-विवाद सुरू होते. यात शेकडोंचे अर्ज येतात पण शिफारस केवळ दहा जणांची करता येते.

त्यामुळे एक तर हा कोटा पूर्णपणे रद्द करा किंवा वाढवा अशा पद्धतीची मागणी होत होती. देशभरात जवळपास बाराशे केंद्रीय विद्यालय आहेत. शिक्षणाचा दर्जा चांगला आणि फी तुलनेनं कमी असल्यामुळे अनेक पालकांचा ओढा केंद्रीय विद्यालयांकडे असतो. मागच्या वर्षी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा 450 प्रवेशांचा कोटा देखील बंद करण्यात आला होता.

केंद्रीय विद्यालय संघटनेकडून सांगण्यात आलं आहे की, अजून केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाशी संबंधित कोट्याबाबत कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही. सध्या केवळ यावर स्थगिती देण्यात आली आहे. यासोबत दुसऱ्या प्रकारच्या विशेष कोट्यांच्या बाबतीत देखील विचार केला जात आहे. ज्यात जिल्हाधिकारी, केंद्रीय विद्यालयातील कर्मचारी या कोट्यांचा समावेश आहे.

संघटनेकडून सांगण्यात येत आहे की, या निर्णयासंदर्भात अभ्यास केल्यानंतर यावर बोर्ड आफ गर्व्हनंसच्या बैठकीत विचारविमर्श केला जाईल. या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्रीही उपस्थित असतील. याचवेळी कोणता कोटा चालू राहणार आणि कोणता कोटा बंद होणार यावर अंतिम निर्णय होईल.

केंद्रीय विद्यालयांमध्ये यंदा प्रवेश प्रक्रियेला देखील उशीर होत आहे. या विलंबासाठी कोरोना आणि विद्यार्थ्यांच्या वयाची अट ही दोन मुख्य कारणं सांगितली जात आहेत. केंद्रीय विद्यालयांमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी वयाची अट सहा वर्ष करण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला होता. ज्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र कोर्टानं राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी योग्य असल्याचं सांगत यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

Monday, April 11, 2022

ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

औरंगाबाद : ईडीचा राक्षसी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सोमवारी येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने आयोजित ओबीसी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सामाजिक समता पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की, या कायद्याचा दुरुपयोग वाढला आहे. विशेषत: जी राज्ये बिगरभाजपाशासित आहेत, तिथे याचा मोठा त्रास सुरू झाला आहे. जरा विरोधात बोलले की ईडीची पीडा लागलीच म्हणून समजा. हा लोकशाहीला धोका असून, तो वेळीच दूर केला गेला पाहिजे.

उज्ज्वला गॅस योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जो डेटा वापरला जात आहे, तो ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी देताना केंद्र सरकार नाक मुरडते, असेही ते म्हणाले.

"'त्यांनी' स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं"; सुजात आंबेडकरांचे थेट राज ठाकरेंना आव्हान

"'त्यांनी' स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं"; सुजात आंबेडकरांचे थेट राज ठाकरेंना आव्हान

मुंबई : राज्यात सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या वक्तव्यावरून राजकारण सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी, विरोधक आणि मनसे पक्षातील अनेक नेत्यांनी राज यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजत आंबेडकर यांनीदेखील राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी आता चक्क राज ठाकरे यांना थेट आव्हान देत राज्यात जर दंगलीचा पेटव्याच्या असतील तर अगोदर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरावा असे म्हटले आहे.

सुजात आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. ही घटना ताजी असतानाच सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. अमित राज ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, असे ते म्हणाले. दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं आणि स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा थेट इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

अमित ठाकरे यांना स्वतः पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, की तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात, माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

माझं वक्तव्य पटल्याचं अनेक जणांनी मला सांगितलं. कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लिम बांधव मनसेचा राजीनामा देत बाहेर पडले आहेत. अनेक जणांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोधही केला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Saturday, April 9, 2022

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे केईएममधील सशुल्क सेवा विभाग सुरू

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे केईएममधील सशुल्क सेवा विभाग सुरू

मुंबई: कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे केईएमधील रुग्णांसाठी पुन्हा एकदा सशुल्क सेवा सुरू करण्यात येणार असल्यामुळे मध्यमवर्गातील रुग्णांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) केईएमध्ये दिलेल्या देणगीच्या माध्यमातून एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागात प्रतिखाट २०० रुपये शुल्क आकारून रुग्णांना सेवा दिली जाते. ही सेवा जवळपास तीन दशकांहूनही अधिक काळ सुरू आहे. रुग्णालयातील अन्य रुग्णांप्रमाणेच सर्व उपचार या रुग्णांना मिळतात. तेथे रुग्णांना राहण्याची आणि नातेवाईकांना थांबण्यासाठी सोय असते.

हा विभाग कोरोना काळात कार्यरत नव्हता. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यावर एसबीआय विभागात मज्जारज्जूंशी संबंधित आजारांचा विभाग (न्युरोलॉजी) हलविण्यात आला होता. जुलै २०२१ मध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यावर हा विभाग पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला. केईएमध्ये काही विभाग रुग्णांसाठी सशुल्क उपलब्ध करण्याचा प्रस्तावही त्यावेळी मांडण्यात आला आल्याचे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

केईएमध्ये पैसे आकारून प्रत्येक वॉर्डमध्ये दोन खोल्यांमध्ये सेवा देण्याची सुविधा होती. यात एका खोलीत एक किंवा दोन खाटा होत्या. यामध्येही अनेक मध्यमर्गीय रुग्ण उपचार घेत होते. कोरोनाकाळात खाटांची संख्या कमी पडायला लागल्यामुळे हे विभाग बंद केले. त्यावेळी रुग्णांचा भार असल्यामुळे अशी स्वतंत्र सेवा देणे शक्य नव्हते. या खोल्यांचा वापर पीपीई कीट घालणे आणि काढणे यासाठी केला जाऊ लागला. कोरोना कमी झाल्यानंतर या खाटाही सुरू करण्याचे प्रस्तावित केले होते, असे देशमुख यांनी सांगितले. आता पुन्हा एसबीआय विभाग सुरू केला जाणार आहे. यामध्ये १७ खाटा असतील. हा विभाग पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि अन्य उपाययोजना केल्या जात असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

एकीकडे खासगी रुग्णालयातील दर परवडणारे नाहीत आणि दुसरीकडे मोफत सेवा देणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयांमधील गर्दीमुळे मध्यम वर्गाची कुचंबणा होते. एसबीआय विभागामध्ये अनेक मध्यमवर्गीय रुग्ण दाखल होऊन सेवा घेतात. परंतु क्ष किरण, सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी या रुग्णांना अन्य रुग्णासोबतच रांगेत राहावे लागत होते. हे गैरसोयीचे असल्यामुळे रुग्ण अनेकदा तक्रार करायचे. या सोयीदेखील पैसे आकारून उपलब्ध कराव्या. खरतर मध्यमवर्गीयांसाठी खासगी रुग्णालयाच्या तुलनेत कमी पैसे आकारून सेवा देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. ही सध्या शहराची गरज असल्याचे मत पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

श्री विठ्ठल मंडळ-ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२२. संघर्ष मंडळ महिलांत उपांत्य फेरीत, तर ओम् कबड्डी, जय हनुमान पुरुषांत उपांत्यपूर्व फेरीत दाखल.

श्री विठ्ठल मंडळ-ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२२.
 संघर्ष मंडळ महिलांत उपांत्य फेरीत, तर ओम् कबड्डी, जय हनुमान पुरुषांत उपांत्यपूर्व फेरीत दाखल.
     ठाणे दि. ०९ :- संघर्ष मंडळाने श्री विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली. पुरुषांत ओम कबड्डी, जय हनुमान मंडळाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाण्याच्या लोकमान्य नगरात सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याच्या संघर्ष मंडळाने नवी मुंबईच्या रा.फ.नाईक या बलाढ्य संघाला २८-२५ अशी धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. आक्रमक खेळाची सुरुवात करीत पहिल्याच डावात १८-११ अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत ही आघाडी टिकविली आणि सामना आपल्या बाजूने झुकविला. देवयानी पाटील,स्नेहा म्हात्रे, प्रतीक्षा मारकड यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. तनुजा गोळे, तृप्ती मोरे यांच्या खेळाचा आज प्रभाव पडला. या अगोदर झालेल्या महिलांच्या सामन्यात ठाण्याच्या होतकरू मंडळाने ५-५ चढायांच्या डावात चिंतामणी स्पोर्ट्स संघावर ३१-२७(९-५)असा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्राजक्ता पुजारी,चैताली बोराडे, सायली शिंदे, वृषाली गाला यांच्या चतुरस्त्र खेळाने होतकरूने पूर्वार्धात १७-०९अशी मोठी आघाडी घेतली होती.पण उत्तरार्धात रेखा चिकणे, रुचिता मोडक, प्रतीक्षा जाधव, वैष्णवी गेडाम यांनी आपला खेळ उंचावत चिंतामणीला २२-२२ अशी बरोबरी साधून दिली. पण विजय मात्र त्यांच्या हातून निसटला. जादा डावात होतकरून बाजी मारली.
प्रथम श्रेणी स्थानिक गटात ओम कबड्डी कल्याण संघाने मध्यांतरातील ०७-१० अशी ३गुणांची पिछाडी भरून काढत अश्वमेध स्पोर्ट्सचा २०-१५ असा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जयंत काते, जय गिरीधर यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अश्वमेधच्या महेश शेलार, मयूर कदम यांना पूर्वार्धातील खेळातील चमक उत्तरार्धात न दाखविता आल्याने पराभवाचा सामना करावा लागला. काल्हेरच्या जय हनुमान संघाने ठाण्याच्या मावळी मंडळाला २८-२५ असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात १०-१८ अशा ८गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जय हनुमानने उत्तरार्धात जोशपूर्ण खेळ करीत बाजी पलटविली. गौरव पाटीलचा अष्टपैलू खेळ त्याला वैभव पाटीलची मिळालेली उत्तम साथ यामुळे जय हनुमानने ही किमया साधली. मावळीच्या ज्ञानेश भिलारे, अभिजित घरे यांचा खेळ उत्तरार्धात थोडा कमी पडला. इतर सामन्यांचा निकाल संक्षिप्त :- महिला गट १)छत्रपती शिवाजी मंडळ वि वि स्फूर्ती सेवा मंडळ(४५-३८); २)संकल्प मंडळ वि वि अश्वमेध फाउंडेशन (२३-१५). प्रथम श्रेणी स्थानिक पुरुष गट :-१) छत्रपती शिवाजी मंडळ वि वि नवी मुंबई प्रबोधिनी(३३-२७); २)श्री हनुमान मंडळ वि वि ओम न्यूवर्तक स्पोर्ट्स(३३-२६).

Friday, April 8, 2022

सगळेच प्रश्न आम्ही सोडवायचे, मग लोकसभा, राज्यसभा काय करणार?, सरन्यायाधीश भडकले

सगळेच प्रश्न आम्ही सोडवायचे, मग लोकसभा, राज्यसभा काय करणार?, सरन्यायाधीश भडकले

मुंबई : कधी निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेचा विषय, तर कधी लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा. सर्व समस्या घेऊन लोक उठसूठ कोर्टापुढे येतात. सगळेच प्रश्न जर आम्ही सोडवाोयचे, तर मग तुम्ही सरकार का निवडून दिले आहे?

लोकसभा, राज्यसभा ही सभागृहे काय कामे करणार? असा खडा सवाल याचिकाकर्त्याला करीत सर्वोच्च न्यायालयाने खटल्यांचा ताण वाढल्याबद्दल गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. घुसखोरांना हद्दपार करण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घ्या, अशी विनंती याचिकाकर्ते वकिल अश्विनी उपाध्याय यांनी केली. त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही.

रमण्णा यांच्या खंडपीठाने हा नाराजीचा सूर आळवला. तसेच याचिकाकर्त्याला याबाबत सरकारकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. सगळे प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटणार असतील, मग लोकसभा, राज्यसभा काय करणार? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी केला.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...