Monday, April 11, 2022

"'त्यांनी' स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं"; सुजात आंबेडकरांचे थेट राज ठाकरेंना आव्हान

"'त्यांनी' स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं"; सुजात आंबेडकरांचे थेट राज ठाकरेंना आव्हान

मुंबई : राज्यात सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या वक्तव्यावरून राजकारण सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी, विरोधक आणि मनसे पक्षातील अनेक नेत्यांनी राज यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजत आंबेडकर यांनीदेखील राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी आता चक्क राज ठाकरे यांना थेट आव्हान देत राज्यात जर दंगलीचा पेटव्याच्या असतील तर अगोदर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरावा असे म्हटले आहे.

सुजात आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. ही घटना ताजी असतानाच सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. अमित राज ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, असे ते म्हणाले. दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं आणि स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा थेट इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

अमित ठाकरे यांना स्वतः पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, की तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात, माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

माझं वक्तव्य पटल्याचं अनेक जणांनी मला सांगितलं. कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लिम बांधव मनसेचा राजीनामा देत बाहेर पडले आहेत. अनेक जणांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोधही केला आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...