Friday, March 11, 2022

Devendra Fadnavis: 'लढाई संपलेली नाहीये, खरी लढाई मुंबईत होणार' गोवा जिंकताच देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

Devendra Fadnavis: 'लढाई संपलेली नाहीये, खरी लढाई मुंबईत होणार' गोवा जिंकताच देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई : गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुंबईत आज जंगी स्वागत करण्यात आलं.

ढोल-ताशांच्या गजरात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन (BJP celebration in Mumbai after wins Goa election) करण्यात आलं. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. पुढची लढाई मुंबईत होणार देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. पण लढाई संपलेली नाहीये.

कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाहीये. अधिक मेहनत करायची आहे. आता खऱी लढाई मुंबईत होणार आहे. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाहीये तर मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे.

आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मुंबईतील मैदानात उतरलो आहोत. या मुंबई महानगरपालिकेला जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून पुन्हा कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई :  आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

Wednesday, March 9, 2022

निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं?

निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील.

मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का? कुठलीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्याच रकमेला डिपॉझिट म्हटले जाते. जर कुठल्याही उमेदवाराला ठराविक मते मिळाली नाही, तर त्यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त केली जातात.

डिपॉझिटची रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डिपॉझिटच्या रकमेचा उल्लेख हा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स अॅक्ट १९५१ मध्ये आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अनामत रकमेचा उल्लेख प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट १९५२ मध्ये करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीमध्ये सामान आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम निश्चित केलेली आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांसाठीत सारखीच अनामत रक्कम निश्चित केलेली असते.
लोकसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराला २५ हजार तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते. तर विधानसभा निवडणुकीती सामान्य वर्गातील उमेदवारांना १० हजार आणि एससीएसटी वर्गातील उमेदवारांनी ५ हजार रुपये जमा करावे लागतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावी लागते.

डिपॉझिट कधी जप्त होते
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही उमेदवाराला त्या जागेवर पडलेल्या एकूण मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते.
- जर कुठल्याही जागेवर १ लाख मते पडली आणि तिथे पाच उमेदवारांना १६ हजार ६६६ पेक्षा कमी मते मिळाती तर त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त केली जाते.
- हा फॉर्म्युला राष्ट्रपी आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्येही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी १/६ मते मिळवण्याची आवश्यकता असते.

कुठल्या परिस्थितीत डिपॉझिट परत केलं जातं
-उमेदवाराला जेव्हा एकूण मतदानाच्या १/६ टक्क्यांपेक्षा मते मिळतात. तेव्हा त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जाते.
- जिंकणाऱ्या उमेदवरालाही त्याची डिपॉझिट रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली तरी ही रक्कम परत केली जाते.
- मतदान सुरू होणयापूर्वी जर कुठल्याही उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते.
- उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यावर किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर डिपॉझिट रक्कम परत केली जाते.

Tuesday, March 8, 2022

यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील – इंदुरीकर महाराजांचे युट्युबर्स बद्दल वादग्रस्त वक्तव्य

यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील – इंदुरीकर महाराजांचे युट्युबर्स बद्दल वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : ८ मार्च – अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी त्यांच्या किर्तनातून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केलीय. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आहे.
अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराजांनी या किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य केल्याचं वृत्त आहे. या किर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकलं. व्हिडीओ काढू नका असं त्यांनी अनेकदा सांगितलं. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.
इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वादात अडकले आहेत. २०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली.
याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान करोनासंदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असं म्हटलं होतं. “मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.
तसेच महिन्याभरापूर्वी इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात माळा काढणाऱ्यांसाठीच करोनाची तिसरी लाट आहे असं म्हटलं होतं. यावरुनही बराच वाद झाला होता. “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर म्हणालेले.

केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत तन्वी फाउंडेशनच्या ज्योती पाटील यांचा भाजप प्रवेशअभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत अनेक महिला दिनी अनेक महिलांचा सत्कार

केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत  तन्वी फाउंडेशनच्या ज्योती पाटील यांचा भाजप प्रवेश

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत अनेक महिला दिनी अनेक महिलांचा सत्कार

ठाणे  : जागतिक महिलादिनी केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत दिव्यातील समाजसेविका व तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती राजकांत पाटील या दामपत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. समाजसेविका सौ ज्याती पाटील तन्वी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला पतपेढी तसेच अनेक महिलांचे बचत गट चालवत असल्याने दिवा शहरातील अनेक महिलांना रोजगार व कमवण्याची संधी मिळाली आहे. अनेक सामाजिक उपक्रम व शिबीर आयोजित करत असतात.

 आज जागतिक महिलादीना निमित्त अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थित अनेक महिलांचा प्रशिस्तपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ज्योती पाटील यांचं कौतुक केले.

तन्वी फाऊंडेशनच्या ज्योती राजकांत पाटील यांनी महिला दिनाच्या मुहूर्तlवर केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, दिवा भाजप मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, विजय भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनेक बचत गटाच्या महिलांसह भाजप मध्ये प्रवेश केला असल्याने दिव्यात भाजपचे पारडे जड झाले आहे.

Monday, March 7, 2022

एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?

एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?'
मुंबई : मध्यंतरी काही लोक सोडून गेले, जे गेले ते गेले, त्याची चिंता करायचे कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी केले. ते बऱ्याच वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.

जोपर्यंत मला साथ आहे, तोपर्यंत या राज्याच्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी काम करतच राहणार, असा विश्वास त्यांनी बोलुन दाखवला. सोबतच रशिया-युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.

राज्यातील जनतेने भरभरून साथ दिली. एकदा नाही तर चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे, असे ते यावेळी म्हणाले.

सोनाराने कान टोचताच हार्दिक पांड्या सरळ झाला; गपगूमान NCAत दाखल होण्यास तयार झाला

सोनाराने कान टोचताच हार्दिक पांड्या सरळ झाला; गपगूमान NCAत दाखल होण्यास तयार झाला

मुंबई : , इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) १० दिवसांचे फिटनेस कॅम्प भरवले आहे.


पण, त्यात न जाता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने अहमदाबाद येथेच तंदुरूस्तीसाठी मेहनत घेणार असल्याचे कळवले. मात्र, निवड समितीने दम भरला आणि हार्दिकला यू टर्न घ्यावा लागला. आता हार्दिक फिटनेस कॅम्पसाठी NCA मध्ये दाखल होण्यास तयार झाला आहे.

''होय, हार्दिक पांड्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे. कॅम्पसाठी बोलावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता, त्यानं त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणतेच अपडेट दिले नव्हते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे संकेत निवड समितीने त्याला दिले. त्यानतंर त्याचे नाव या यादीत समाविष्ठ करण्यात आले. मंगळवारी तो कॅम्पमध्ये दाखल होईल,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport.ला सांगितले.

हार्दिक NCA कॅम्पला सतत दांडी मारत होता आणि त्यावरून निवड समिती नाराज होती. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या शर्यतीत अजूनही हार्दिक पांड्या आहे. पण, त्याने मुंबई व अहमदाबाद येथेच तंदुरुस्तीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण, निवड समिती अध्यक्षांचा एक फोन गेला अन् हार्दिकनं निर्णय बदलला. आता हार्दिकच्या तंदुरुस्तीवर NCA त लक्ष ठेवले जाईल आणि तो आयपीएल २०२२ साठी फिट झाल्यास त्याचा जूनमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही विचार केला जाईल.

BCCIने मागील आठवड्यात इशान किशन, भुवनेश्वर कुमार व वेंकटेश अय्यर यांच्यासह २५ खेळाडूंना NCA कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. NCA अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली हा कॅम्प भरवला गेला आहे. हार्दिकचा भाऊ कृणाला याला मात्र या कॅम्पसाठी बोलावलेले नाही.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...