एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?'
मुंबई : मध्यंतरी काही लोक सोडून गेले, जे गेले ते गेले, त्याची चिंता करायचे कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी केले. ते बऱ्याच वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.
जोपर्यंत मला साथ आहे, तोपर्यंत या राज्याच्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी काम करतच राहणार, असा विश्वास त्यांनी बोलुन दाखवला. सोबतच रशिया-युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.
राज्यातील जनतेने भरभरून साथ दिली. एकदा नाही तर चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे, असे ते यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment