Friday, March 11, 2022

Devendra Fadnavis: 'लढाई संपलेली नाहीये, खरी लढाई मुंबईत होणार' गोवा जिंकताच देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

Devendra Fadnavis: 'लढाई संपलेली नाहीये, खरी लढाई मुंबईत होणार' गोवा जिंकताच देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई : गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुंबईत आज जंगी स्वागत करण्यात आलं.

ढोल-ताशांच्या गजरात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन (BJP celebration in Mumbai after wins Goa election) करण्यात आलं. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. पुढची लढाई मुंबईत होणार देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. पण लढाई संपलेली नाहीये.

कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाहीये. अधिक मेहनत करायची आहे. आता खऱी लढाई मुंबईत होणार आहे. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाहीये तर मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे.

आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मुंबईतील मैदानात उतरलो आहोत. या मुंबई महानगरपालिकेला जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून पुन्हा कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...