Friday, February 25, 2022

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी,

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती, १८-६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी, अन्...

कीव - रशियानं लष्करी हल्ला केल्यानं यूक्रेन सध्या संकटात सापडला आहे. त्यातच अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी सैन्य पाठवण्यास नकार दिल्याने यूक्रेनसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

त्यात यूक्रेननं कीवच्या बाहेरील एअरपोर्ट पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता १८-६० वयोगटातील सर्व पुरुषांना देशाबाहेर जाण्याची बंदी घातली आहे.

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी देशातील आपत्कालीन स्थितीमुळे सक्तीची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. ६० हजार सैन्य देशाच्या रक्षणासाठी तैनात असल्याचं यूक्रेननं सांगितले आहे. पुतिन यांनी यूक्रेनच्या सीमेवर जवळपास १ लाख ९० हजार सैनिक पाठवले आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दोन्ही देशातील युद्धात आतापर्यंत १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. यूक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने आरोग्य सुविधा सज्ज करण्याचे आदेश दिलेत. जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीत जखमी लोकांना आणि सैन्यांना तात्काळ आवश्यक उपचार दिले जातील.

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गारठाणे

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

ठाणे (प्रतिनिधी)-  केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांच्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते. 
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या  पक्षांच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय,  एनआयए,  आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, माजी  विरोधी  पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, उथळसर प्रभाग समिती सभापती वहिदा खान, नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते, अंकिता शिंदे, आरती गायकवाड,  परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राजेश जाधव , रमेश इंदिसे  यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.  

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. महविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.  ज्यावेळी इडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जाते. हेच स्पष्ट होत आहे. गुरुवारी भाजपवाल्यांनी नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करुन त्यांचा अपमान केला आहे. 

विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर  उतरले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला यांनीही यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. जे लोक विरोधात बोलतात त्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना पराभव दिसत असल्यानेच हे घाणेरडे राजकारण भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु केले आहे.  जो पर्यंत भाजप संपणार नाही; तोचपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे; नवाब मलिक हे निर्दोष असूनते मुस्लीम असल्यानेच त्यांना दाऊदचे नाव जोडण्यात आले आहे. प्रत्येकवेळी मुस्लीम नेतृत्व पुढे आले की त्यांना अडकविण्याचा भाजपचा हा प्रयत्न नेहमी असतो, अशी टीका मुल्ला यांनी केली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष,  ब्लॉक, प्रभाग अध्यक्ष, कार्यकर्ते   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Russia Ukraine War: भारत कुणासोबत?

Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे.

भारतानं आतापर्यंत याप्रकरणात आपली नि:पक्ष भूमिका कायम ठेवली आहे. एका बाजूला बहुतांश देश रशियाच्या भूमिकेची निंदा करत असताना भारतानं रशियाच्या आक्रमणाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचवेळी अमेरिकेतही आता भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बायडन यांनी रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत अमेरिका भारताशी चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, युक्रेनवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जो बायडन यांना भारत रशियाच्या विरोधात अमेरिकेसोबत आहे का? असा प्रश्न विचारला. "आम्ही भारतासोबत युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. याप्रकरणावर अद्याप कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघालेला नाही", असं जो बायडन म्हणाले.

अमेरिकेचा राष्ट्रपती विभाग, परराष्ट्र विभाग आणि अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा परिषद अशा विविध पातळ्यांवर बायडन प्रशासन युक्रेन संकटावर भारताकडून पाठिंब्याची मागणी करत आहे. तसंच विविध स्तरांवर भारतीय समिक्षकांशी याबाबत चर्चा केली जात आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी युक्रेनच्या संकटाबाबत चर्चा केली. रशियाच्या हल्ल्याची निंदा, रशियन सैन्यानं तात्काळ घरवापसी आणि युद्धविरामाचा आवाहन करण्यासाठी एक मजबूत सामूहिक प्रतिक्रिया देण्याची गरज असल्याचं ब्लिंकन यांनी जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.

Wednesday, February 23, 2022

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांवर सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांवर सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला,

सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका

मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यातील ताणलेल्या संबंधाचे पडसाद मुंबई शेअर बाजारावर दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सेन्सेक्सची पडझड सुरु होती. अशातच गुरुवारी सकाळी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे.

तब्बल 2 हजार अंकानी सेन्सेक्सची पडझड झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीचीही घसरण झाली आहे. या पडझडीमुळे एका झटक्यात तब्बल 9 लाख कोटी रुपयांचं नुकसानं झालंय. निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे रेडझोनमध्ये गेले आहे. तर सेन्सेक्सच्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसलाय. रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय. त्या हल्लाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवर होताना पाहायला मिळत आहेत. याचा फटका मुंबई शेअर बाजारावरही होतोय.

Wednesday, October 13, 2021

दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

 नांदेड : स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून भक्तांना गंडवणाऱ्या बाबाला नांदेड (Nanded)मध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात हा भोंदूबाबा तरबेज होता.

नांदेड जिल्ह्यातील माहूर (Mahur) येथे कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले (Fake baba kapile maharaj) या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Fake godman vishwajeet kapile arrest) या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बाबासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला.




भोंदूबाबासह तीन जणांना माहूर पोलिसांनी अटक केली आहे. मागील तीन वर्षांपासून माहूर येथे टीनशेट उभारून या भोंदूबाबाने अघोरी कृत्य सुरू केले. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे यासाठीच दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे.


यज्ञ करून त्याची राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता. त्यासाठी भक्तांकडून बाबाने लाखो रुपये उकळले. डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल 24 लाख रुपयांचा गंडा घातला.


तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली. शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली. त्यांनंतर त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विश्वजित कपिले याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केला.

Sunday, October 10, 2021

रेल्वेकडून पुढील 6 महिन्यांसाठी करोना मार्गदर्शक तत्त्वे जारी!; दुर्लक्ष केल्यास भारी दंड भरावा लागणार

 

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा नियम करोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान त्याकडे दुर्लक्ष करू नका.

सध्या देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अलर्ट अंतर्गत, पुढील तीन महिने अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यामुळेच अत्यंत काळजीघ्यावी लागणार आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार, निष्काळजीपणामुळे करोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते. या संदर्भात सर्व विभागांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'




रेल्वेच्या करोना महामारीबाबत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वातील कठोरता अजूनही अबाधित आहे. हेच कारण आहे की रेल्वेने करोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे पुढील 6 महिन्यांसाठी वाढवली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वात मास्कची अनिवार्य आवश्यकता देखील अबाधित आहे.


* रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हे मार्गदर्शक तत्व पूर्वीही होतेच, आता ती पुढील 6 महिन्यांसाठी म्हणजेच एप्रिल 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने सांगितले, प्रवाशांना विनंती केली जाते की प्रवास सुरू होण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक सूचना वाचा.


* पुढील तीन महिने सण आणि लग्नाशी संबंधित हंगाम आहेत, ज्यामुळे गर्दी वाढू शकते. सणासुदीच्या काळात रेल्वे परिसर किंवा प्लॅटफॉर्मवर गर्दी होण्याची शक्यता आहे. वास्तविक, रेल्वेने दिवाळी आणि छठ सणामुळे विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत बुकिंग वाढेल आणि प्लॅटफॉर्म किंवा रेल्वे परिसरात गर्दी होईल. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे.


17 एप्रिल 2021 पासून रेल्वेकडून 500 रुपयांचा दंड लागू करण्यात आला, जो 6 महिन्यांसाठी होता. याला आणखी 6 महिन्यांनी 16 एप्रिल 2022 पर्यंत वाढविण्यात आली. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...