Tuesday, August 10, 2021

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

मुंबई - सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. अशातच काही दिवसांपूर्वी यंदा लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळाने दिली होती. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावमुळे 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. पण यावर्षी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा पार पडला.



यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे.

यंदा मंडळातर्फे शुक्रवार म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.


आज पहाटे सहा वाजता जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोना निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिले आहे, त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळाकडून तयारी केली जाणार आहे.


याबाबत माहिती देताना लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले की, लालबागच्या राजाची लाखो भाविक वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन, ऑनलाइन प्रसादाची सुविधा केली जाणार आहे. त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही.

Sunday, August 8, 2021

क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा राज्य सरकारनेच उभारावी"- रावसाहेब दानवे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे दानवे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.



'करोनाची सुरुवात झाल्यानंतर २२ मार्च २०२० ला लोकल सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही ठराविक प्रवाशांसाठी १५ जूनपासून सेवा सुरु करण्यात आली होती.

रेल्वेची भूमिका कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्याला करोना स्थिती नियंत्रणात आली असेल तर केंद्राला कळवा आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत रेल्वे आणू असे सांगत होते. असेही सध्या ९० टक्के फेऱ्या सुरुच आहेत,' असे रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हटले.

प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. 'जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता,' असेही ते म्हणाले.


हे क्यूआर कोड काढण्याची आणि तपासण्याची जबाबदारी कोणाची? अशी विचारणा करताना रावसाहेब दानवेंनी रेल्वेच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासले पाहिजेत असे सांगत राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे.


'राज्य सरकारलाच ही तपासणी करावी लागणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल,' असे त्यांनी म्हटले आहे. ही घोषणा फार आधी व्हायला हवी होती. पण आमच्याकडून स्वागत आहे असेही ते म्हणाले आहेत.

पहिला श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराचे गाभारे सजले, दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी बंदच


आज पहिला श्रावणी सोमवार आहे. आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यानिमित्त राज्यातील शिव मंदिराचे गाभारे सजले आहेत. मात्र मंदिराजे दरवाजे आज फक्त पूजेसाठी खुले राहणार आहेत. मात्र, अनेक मंदिरांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. तर पुण्यातील भीमाशंकर येथे सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल मंजुळा हुन्नुर यांनी केलीय. सजावटीनंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं सावळे सगुण रुप पाहायसा मिळत आहे.



Saturday, August 7, 2021

नाशिकमध्ये आढळले डेल्टा व्हेरिएंटचे ३० रूग्ण



नाशिक - राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही व तिसऱ्या लाटेची वर्तवली गेलेली शक्यता असताना, आता डेल्टाचा धोका वाढताना दिसत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा नाशिकमध्ये ३० जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले असून, यापैकी २८ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर, हे ३० रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली आहे.



जगातील १३५ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. भारतात हा व्हेरिएंट सर्वप्रथम आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २० कोटी पार करेल, असे ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक कोरोना अपडेटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Friday, August 6, 2021

खाकीतील देव! या महिला पोलिसांनी रिक्षातचं केली पूरात अडकलेल्या गर्भवतीची प्रसूती

मुंबई - भारतात सर्वदूर आरोग्य सेवा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे बरेचदा आदिवासी आणि दुर्गम भागतील गर्भवती महिलांना झोळीतून हॉस्पिटलपर्यंत (Hospital) नेलं जातं. कधीकधी तर वाटेतच ती गर्भवती महिला प्रसूत होते. अशा बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील. पण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका गर्भवती महिलेवर रिक्षेमध्ये प्रसूत (Delivery in Autorickshaw) होण्याची वेळ आली. पण तिच्या मदतीला पोलीस सब इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपाई महिला आल्यामुळे तिला दिलासा मिळाला. वेब दुनियाने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील (Ramgarh District) सुठालिया पोलीस ठाण्यात सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) म्हणून काम करणाऱ्या अरुंधती राजावत आणि महिला पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांनी प्रचंड पावसामुळे रस्त्यावर अडकून पडलेल्या ग्रामीण गर्भवती महिलेची ऑटो रिक्षेत प्रसूती करण्यासाठी मेडिकल स्टाफला बोलवलं आणि एक नवा आदर्शच समाजासमोर ठेवला आहे.



जनतेचं रक्षण करणं ही पोलीस आणि इतर सुरक्षा दलांची जबाबदारी असते पण पोलीस त्याही पलीकडे जाऊन अनेकदा आपलं कर्तव्य बजावताना दिसतात.  राजगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे सगळे रस्ते बंद झाले आहेत. त्यातच मोरपानी या गावातल्या एक गर्भवती महिलेला तिचे नातेवाईक रिक्षेतून (Auto Rickshaw)हॉस्पिटमध्ये नेत होते.


पण प्रचंड पावसामुळे त्यांची रिक्षा वाटेतच अडकून पडली. याबद्दलची मीहिती एसआय अरुंधती राजावत आणि पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मेडिकल स्टाफ तिथे नेऊन त्यांच्या मदतीने रिक्षेतच त्या महिलेची डिलिव्हरी केली. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.


समाजाचं संरक्षण करतानाच सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेल्या या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. अडचणीच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. 

 मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister of Madhya Pradesh) यांनी ट्विट करून या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'शाब्बास SI अरुंधती, पोलीस शिपाई इतिश्री. राजगड जिल्ह्यातील सुठालिया पोलीस ठाण्यात महिला सब इन्स्पेक्टर असलेल्या अरुंधती राजावत आणि पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांनी प्रचंड पावसात रिक्षेत अडकलेल्या गर्भवती महिलेची प्रसूती करण्यासाठी मदत करून आई आणि बाळाला नवा जन्मच दिला आहे. असं करून तुम्ही मध्य प्रदेश पोलिसांचं ब्रीद वाक्य 'देशभक्ती के साथ जनसेवा' याला अनुसरून दैनंदिन जीवनात प्रेरणाघेण्या योग्य एक उदाहरण समाजासमोर मांडलं आहे. संपूर्ण पोलीस परिवाराला तुम्हा दोघींचा अभिमान वाटतो.' अशा शब्दांत गृहमंत्री मिश्रा यांनी कौतुक केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असले, तरी देखील या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.



भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपाला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं - पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय


मुंबई : नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं (Khel Ratna Award) नाव बदलल्याची घोषणा केली. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.



भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...