नाशिक - राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही व तिसऱ्या लाटेची वर्तवली गेलेली शक्यता असताना, आता डेल्टाचा धोका वाढताना दिसत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा नाशिकमध्ये ३० जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले असून, यापैकी २८ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर, हे ३० रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली आहे.
जगातील १३५ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. भारतात हा व्हेरिएंट सर्वप्रथम आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २० कोटी पार करेल, असे ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक कोरोना अपडेटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment