Wednesday, August 4, 2021

मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!


मुंबई : कोरोनाची दुसरी लाट हद्दपार करण्यात पालिकेला यश आले असतानाच आता मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट ओढावले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट गडद होताना दिसत आहे. (The risk of dengue, malaria, lepto, gastro increased in Mumbai)



दरम्यान, पावसाळी आजारांमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते.

यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, 'एच1एन1'चे 44 रुग्ण आढळले होते.

यावर्षी 1 जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण 2318, लेप्टोचे 96, डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 तर 'एच1एन1'चे 28 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही.


त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Tuesday, August 3, 2021

बारावीच्या निकालातही 'या' विभागानं मारली बाजी; बघा विभागनिहाय निकाल

मुंबई : महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 03 ऑगस्टला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र यंदाच्या निकालात दहावीच्या निकालात अव्वल ठरलेला विभागच समोर आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली होती. राजूदातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला होता. त्यानुसार आता बारावीतही कोकण वोभाग्न आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.81 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे.



औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे. इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. विभागानुसार निकालाची टक्केवारी पुणे विभाग - 99.75 नागपूर विभाग - 99.62 औरंगाबाद विभाग - 99.34 मुंबई विभाग - 99.79 कोल्हापूर विभाग - 99.67 अमरावती विभाग - 99.37 नाशिक विभाग - 99.61 लातूर विभाग - 99.65 कोकण विभाग - 99.81

Monday, August 2, 2021

कुपोषणाचे निर्मूलन करणार पवईच्या आयआयटीचा 'सेव्हन-इन-वन आहार'

मुंबई : हिंदुस्थानात मुलांच्या जन्मापासूनच ही कुपोषणाची समस्या दिसून येते. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्येही ती गंभीर होत चालली आहे. कुपोषणामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक अपंगत्वच नव्हे तर प्रसंगी मृत्यूही ओढवतो. या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी सात प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असलेला 'सेव्हन-इन-वन सकस आहार' बनवला आहे. बालके बोटं चाटतील असा हा आहार फक्त पाच मिनिटांत बनवता येऊ शकतो. बालकांना आवडतील असे लाडू, शंकरपाळ्या, खीर, लापशी, उपमा, झुणका, नानकटाई आदी पदार्थ त्यापासून बनवता येऊ शकतात.



कुपोषणाच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आयआयटी मुंबईतील ज्येष्ठ संशोधक प्रा. पार्थसारथी यांच्या नेतृत्वाखालील टीमने बालकांसाठी हा सकस आहार बनवला.

कुपोषण रोखण्यासाठी पेंद्र सरकारकडून कार्यक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत बालकांना आहार पुरवला जातो. तो आहार प्रामुख्याने ग्रामीण बालकांना नजरेसमोर ठेवून बनवला गेला आहे. शहरी भागातील झोपडपट्टय़ांमध्येही कुपोषणाची समस्या आहे. त्या समस्येचा सामना करण्यासाठी तो आहार पुरेसा नाही.

प्रा. पार्थसारथी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करणाऱया आहारामध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक आहे. लहान बालकांसाठी आहार बनवताना त्यांना आवडणारी चव, त्यांना आवडतील असे पदार्थ यांचा विचार केला गेला. त्याबाबतचा अहवाल 'पिडीयाट्रीक ऑनकॉल' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो आहार बनवण्यापूर्वी संशोधकांनी 300 सरकारी अंगणवाडय़ा आणि धारावीतील बालक कल्याण पेंद्रांतील बालकांचा अभ्यास केला.


मुलांच्या वाटय़ाचा पोषक आहार कुटुंबात विभागला जातोय


सध्या सरकारकडून बालकांना पोषक आहार रेशन स्वरूपात दिला जातो. त्यात अन्नधान्ये, पीठ यांचा समावेश असतो. तो घरी नेऊन बनवला जातो. तो कशा पद्धतीने बनवला जातोय यावरही त्यातील पोषक घटकांचे प्रमाण अवलंबून असते. सरकारकडून सोयाबिनचे तसेच डाळींचे पीठ मुलांना दिले जाते. त्यात झिंक, लोह, कॅल्शियम तसेच 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांचा समावेश असतो. परंतु पिठाच्या पिशव्या मुले घरी घेऊन जातात तेव्हा त्या फक्त त्यांच्यासाठीच वापरल्या जात नाहीत तर संपूर्ण कुटुंबासाठी वापरल्या जातात. त्यामुळे मुलांना पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळत नाहीत असे दिसून आल्याचे प्रा. पार्थसारथी यांनी सांगितले.


दोन वर्षांखालील बालकांसाठी उपमा, खीर, धान्यपीठांचे मिश्रण असलेली टेस्टी पेस्ट. दररोज 250-300 किलो कॅलरीज आणि 10-12 ग्रॅम प्रोटीन्स.

दोन वर्षांवरील बालकांसाठी नानकटाई, शंकरपाळी आणि झुणका बनवता येईल असा सकस आहार. दररोज 450-500 किलो कॅलरीज आणि 12-15 ग्रॅम प्रोटीन्स.

तीन महिन्यांमध्ये बालकांच्या प्रकृतीमध्ये जाणवला फरक.

सरकारी कार्यक्रमात आहाराचा समावेश करण्याची संशोधकांची विनंती.

मुंबई विमानतळावरील अदानीचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडला

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला.


व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे.






जीवीके प्रमाणे 'मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट' असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.


पंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ


कोलंबो - करोनाची बाधा झालेल्या व सध्या श्रीलंकेत विलगीकरणात असलेल्या तीन भारतीय क्रिकेटपटूंना श्रीलंका सरकारने तातडीने मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान कृणाल पंड्या, यजुवेंद्र चहल व कृष्णाप्पा गौतम यांना करोनाची बाधा झाल्यामुळे सध्या विलगीकरणात ठेवले गेले आहे.



त्यांची सातत्याने चाचणी करण्यात येणार आहे. जर या चाचणीत ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तरच त्यांना भारतात परतता येणार आहे. मात्र, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना विलगीकरणाचा पूर्ण कालावधी पूर्ण केल्यावर तसेच पुन्हा चाचणी करत अहवाल पाहिल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही श्रीलंका सरकारने स्पष्ट केले आहे.


भारताने श्रीलंकेत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. मात्र, टी-20 सामन्यांची मालिका गमवावी लागली. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी पंड्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या भारताच्या आठ खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.


त्यामुळे भारताचे आठ खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यातून बाहेर पडले व त्यांच्या जागी राखीव खेळाडूंना खेळवले गेले होते. कृणालच्या संपर्कात आलेल्या चहल व गौतम यांनाही करोना झाल्याचे समजल्यावर त्यांनाही विलगीकरणात पाठवले गेले. दरम्यान, ही मालिका पार पडल्यावर उर्वरित खेळाडू भारतात परतले. मात्र, या तिघांनी भारतात परतण्याची परवानगी श्रीलंका सरकारने नाकारली.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान - मुख्यमंत्री

 मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्‌गार ठाकरे यांनी काढले. घाटकोपर - मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.


याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनोज कोटक, रईस शेख, आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

याचदिवशी जनतेच्या हितासाठीच्या कामांचे लोकार्पण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने प्रवास करण्याची इच्छा होत नव्हती. मात्र आता हा उड्डाणपूल झाल्यामुळे रोज या पुलावरून प्रवास करण्याची इच्छा होत आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महानगरपालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनांच नव्हे तर संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्‌गार ठाकरे यांनी यावेळी काढले.


उड्डाणपुलांसारख्या विकासकामांच्या माध्यमातून दुरावा कमी होवून वेळेची बचत होत आहे हे आपण अनुभवतो आहोत. जनतेने शासनाला जनहिताची कामे करण्याची संधी दिली आहे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. राज्य सरकारने जनतेला दिलेले वचन आजपर्यंत पाळले आहेत आणि ते यापुढेही पाळले जाईल. या उड्डाणपुलाची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. 'दृष्टी आड सृष्टी' अशी स्थिती होऊ देऊ नका.


पूर्वी या परिसरातील वस्त्या बकाल असायच्या आता या वस्त्यांतील नागरिकांचे राहणीमान उंचावेल यासाठी काम केले पाहिजे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून उपयुक्त आणि आखीव-रेखीव अशी विकासकामे करणे आवश्यक असते. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचण्याचा विचार केला तसा पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देण्यासाठी देखील विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. जनतेचं सहकार्य असेल तर चांगली विकासकामे निश्चित होतात. स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्मितीसाठी आराखडा तयार करावा,अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.


कोरोना महामारीच्या संकटात मुंबई मॉडेल म्हणून जगभरात ओळख निर्माण झाली याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे. याच श्रेय महापालिका प्रशासन आणि नागरिकांना जाते. कोरोनाच्या संकटात विकासाची गती थोडी मंदावलेली असली तरी विकास कामे थांबलेली नाहीत. महापालिकेमार्फत सुरु असलेल्या कामांना आजपर्यंत राज्य शासनाने सहकार्य केलेले आहे. जनतेला सुखी, समाधानी आणि आनंदाचे आयुष्य लाभावे. यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना राज्य शासनाचा पाठिंबा राहील.



येथील एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्यामुळे परिसरातील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. हा उड्डाणपूल शिवाजी नगर जंक्शन ते मोहिते पाटील जंक्शनपर्यंत 2.90 किमी लांबीचा आहे. या उड्डाणपुलामुळे शिवाजी नगरजंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राउंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील हे परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यास मदत होणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई, पनवेल, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा 25-30 मिनीटांचा वेळही वाचणार आहे.

वाहन कंपन्यांच्या विक्रीमध्ये जुलैमध्ये झाली भरघोस वाढ, आर्थिक स्थैर्य आणि वाढत्या मागणीचा परिणाम

नवी दिल्ली : कोरोनाचा कमी होत असलेला प्रसार, देशाला लाभत असलेले आर्थिक स्थैर्य आणि वाढलेल्या मागणीमुळे जुलै महिन्यात प्रमुख वाहननिर्मिती कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली असून, त्यामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. मागील वर्षापासून वाहन उद्योगाला सातत्याने विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे.



जुलै महिन्यामध्ये झालेल्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामधील वाढ समाधानकारक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती- सुझुकीच्या विक्रीमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...