Monday, August 2, 2021

वाहन कंपन्यांच्या विक्रीमध्ये जुलैमध्ये झाली भरघोस वाढ, आर्थिक स्थैर्य आणि वाढत्या मागणीचा परिणाम

नवी दिल्ली : कोरोनाचा कमी होत असलेला प्रसार, देशाला लाभत असलेले आर्थिक स्थैर्य आणि वाढलेल्या मागणीमुळे जुलै महिन्यात प्रमुख वाहननिर्मिती कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली असून, त्यामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. मागील वर्षापासून वाहन उद्योगाला सातत्याने विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे.



जुलै महिन्यामध्ये झालेल्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामधील वाढ समाधानकारक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती- सुझुकीच्या विक्रीमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे.

Saturday, July 31, 2021

मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या": एकनाथ शिंदे


पुणे: कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर या भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.



(eknath shinde says centre govt should give big aid for flood affected Maharashtra)

कोकणात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


शिवसेनेची आरोग्य शिबिरे सुरू


सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास २५० पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  एकनाथ शिंदे यांनी केंद्राला आवाहन केले आहे.

वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका, मंत्रीमहोदयांचा वीज विभागातील अधिकाऱ्यांना सज्जड दम

 अमरावती : शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा इंग्रजांना सारखे वागू नका असा सज्जड इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शुक्रवारी अमरावतीत विज विभागातील अधिकाऱ्यांचा विविध विभागांची अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत प्रसंगी त्यांची कानउघाडणीही यशोमती ठाकूर यांनी केली.




अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम भरण्याचा तगादा अधिकार्‍यांकडून लावला जातो तसेच शेतकर्‍यांची वीज कापली जाते अशा अनेक तक्रारी पालकमंत्री यांच्याकडे आल्या होत्या.

याचा पाठपुरावा करताना पुराच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा ऊर्जा विभागावर ताण येतो आहे, याची माहिती आहे. मात्र, वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसाठी इंग्रजा सारखे वागू नका शक्य तितक्या नरमाईने प्रक्रिया पार पाडा, अशा सूचना यशोमती ठाकूर यांनी यावेळी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.


दरम्यान, अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांची ठाकूर यांनी चांगलीच कान उघाडणी केली अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

९ ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका

मुंबई : १५ जुलै रोजी राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. आता ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका शाळांमधून देण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. यासाठी विभागीय 

मंडळाकडून ७ ते ९ ऑगस्टदरम्यान गुणपत्रिका शाळांना देण्यात येणार आहेत.




शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार व कोविड संबंधित शासनाने, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करत गुणपत्रिकांचे वाटप करायचे आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा गुणपत्रिका ठरविलेल्या दिवशीच घेऊन जाण्यासाठी आग्रह करू शकणार नाही याबाबतीत स्पष्टताही मंडळाकडून देण्यात आली आहे.

निकालाचे गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख शाळांना वितरित करण्यासाठी विभागीय सचिवांना राज्य शिक्षण मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला, गणपतराव देशमुखांना नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

 मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राजकारणी गणपतराव देशमुख यांचा काल(३० जुलै) निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.


ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली


महाराष्ट्राचे उपमुख्यमनातरी अजित पवार यांनी ट्विट करून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला.


कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.


महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे . गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.




गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.


Friday, July 30, 2021

CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला



नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा... अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय. 



यंदाच्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे गेलेल्या बॅचने एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना केला आहे. शैक्षिणक क्षेत्रानेच गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले आहेत. तरीही, सध्याच्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वोत्तम योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन... असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात



भिवंडी : भिवंडी शहरातील नागरिकांना महानगर पालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला गेल्या काही दिवसापासून गढूळ व माती मिश्रीत दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब उलट्यासारखे आजार भेडसावू लागले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.



मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपूरा, निजामपूरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व माती मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.


पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास तक्रारी करून सुद्धा सराईतपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना जुलाब व उलट्या सारखे प्रकार होत आहेत. त्यातच सर्दी खोकल्याची साथ देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.


शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या मुख्य रस्त्यावरून तर काही गटारातून गेलेल्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांमधील नळाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून दुषीत पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने नळाला दुषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी भिवंडी जन संघर्ष समीतीच्यावतीने करण्यात आली आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...