Friday, March 11, 2022

Maharashtra Budget Session 2022

Maharashtra Budget Session 2022 : नव्या बुलेट ट्रेन मार्गाचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाचा विस्तार; राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget Session 2022 :  नव्या बुलेट ट्रेन मार्गाचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाचा विस्तार; राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा
18m00
Maharashtra Budget Session 2022 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विविध विभागांसाठीची तरतूद केली. अजित पवार यांनी राज्यात परिवहन, वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.



यामध्ये समृद्धी महामार्गाचा गडचिरोली, गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार असून मुंबईला जलवाहतुकीशी जोडण्यासाठीच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

अजित पवार यांनी परिवहन वाहतूक व्यवस्थेसाठी केलेल्या घोषणा :

> मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

> गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी केली.

> मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू 2023 च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली.

> एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

> शिर्डी विमानतळाला 150 कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद

> मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

> पर्यावरण पूरक 3 हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

> राज्यात ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे

> मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले

> परिवहन विभागाला 3 हजार 303 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

> पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित

> मुंबई-हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...