Wednesday, March 23, 2022

सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू सत्राचे आयोजन

सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू सत्राचे आयोजन

ठाणे :  चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय मॉक इंटरव्ह्यू सत्राचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या मॉक इंटरव्ह्यूचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ७ जानेवारी रोजी घेतलेल्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २६ आणि २७ मार्च या कालावधीत मॉक इंटरव्ह्यू सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या मॉक इंटरव्ह्यू सत्रात वरिष्ठ सनदी अधिकारी मुलाखत घेणार असून यामध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त विपिन शर्मा, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, सह आयुक्त राहुल कर्डीले, वाहतूक पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील, सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे उप आयुक्त अक्षय पाटील, निवृत्त इंटेलिजन्स ब्युरो & दक्षता अधिकारी एम.के.यादव, उप आयुक्त (सीजीएसटी) अश्विनी अडीवरेकर, उप आयुक्त (सीजीएसटी) डॉ. गौरव मित्तल, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.मृदुल निळे यांचा समावेश आहे. मॉक इंटरव्ह्यू सत्रात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या २५८८१४२१/९८९२३१३९१७/९९६७४०४३८/७८८९६००५७५ या संपर्क क्रमांकावर आणि संस्थेच्या cdinstitute@thanecity.gov.in या ई-मेलवर तसेच https://forms.gle/PTbwtR3jBcaaQoNz7 या लिंकवर दिनांक २४ मार्चपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...