Thursday, August 5, 2021

देशाला हॉकी संघाचा अभिमान; ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून शाबासकी



मुंबैव| टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे.

भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...