Wednesday, July 14, 2021

गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी स्पेशल गाड्या सोडणार

 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबई : गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणाच नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. गणेशोत्सव काळात सीएसएमटी - सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच  सीएसएमटी  - रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या 10 ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या 16 ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.




आपण प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहीजे. 72 गाड्या सोडूनही जर वेटींग असेल. प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने अधिक गाड्या सोडण्याचे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...