मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री 'बालिका वधू' फेम 'सुरेखा सिक्री' यांचं आज (दि. 16) हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. सुरेखा सिक्री 75 वर्षांच्या होत्या.
हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरेखा यांना 2018 मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच 2020 साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. 1978 सालच्या 'किस्सा कुर्सी का' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना 'तमस', 'मम्मो' आणि 'बधाई हो' या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

No comments:
Post a Comment