Monday, March 7, 2022

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईत कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

अनेक जण घरातच राहण्यास पसंती देत आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचं संकट गडद होणार आहे, असे अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर 2050 पर्यंत ही पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी इतके नुकसान होईल, अशी भीती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या भागात व्यक्त करण्यात आली.

2070 पर्यंत यात 2.9 पटीने वाढ होईल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. पळून जाऊन बहिणीशी लग्न केल्यानं घेतला सिनेस्टाईल बदला,नालासोपाऱ्यातील थरारक घटना मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो. दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे. भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार असून, मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळात वाढ होईल. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जर उत्सर्जन वेगाने कमी केले नाही तर जागतिक पातळीवर उष्णता आणि आर्द्रता लवकरच धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ग्लोबल वार्मिगमुळे पृथ्विचे कालचक्रच बदलण्याची भीती संशोधक व्यक्त करत आहेत

Friday, March 4, 2022

आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार

आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
मुंबई : 
जीव मुठीत धरुन विद्यार्थी युक्रेनमध्ये विद्यार्थी दिवस काढत आहे. अशी परिस्थितीत पंतप्रधान उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते,

परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणं झालंय -शरद पवार

युक्रेन हा अतिशय सुंदर देश. आपल्या इथे मेडिकल साठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थी तिथे जातात. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज

उद्या काही अडचण आली, तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे
पुणे (Pune) मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरूड) पर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. शरद पवारांनी जलसंपदा विभाग लक्ष घालेल असं म्हटलंयनदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी अभियान ;

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी अभियान ;  राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने केली स्वाक्षरी

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून स्वाक्षरी मोहीम सुरु केली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी स्वाक्षरी करायला लावली. यावेळी आंदोलनामुळे झिरवळ यांनी भाजपच्या स्वाक्षरी फलकावर मलिक यांच्या विरोधात केली.

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्यावतीने मलिकांच्या राजीमान्यासाठी भाजपवच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅनर तयार करण्यात आले होते. यावेळी आजही विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मलिकांचे हसीना पारकर आणि कुख्यात गुंड दाऊद इब्रहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. दरम्यान आज विधीमंडळ परिसरात राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेसाठी भाजपने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली.

भाजपचे आंदोलन सुरु असताना नरहरी झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत होते. यावेळी त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोधळा दरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली.

Thursday, March 3, 2022

ओबीसी आरक्षणवरून फडणवीस आक्रमक, सभागृह तहकूब

ओबीसी आरक्षणवरून फडणवीस आक्रमक, सभागृह तहकूब 

मुंबई - आज अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाविरोधात वातावरण चांगलंच तापलं असून सभागृहात भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

यातच विधानसभेत ओबीसी आरक्षणावरील चर्चेत गोंधळ झाला असून, भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात 'ओबीसी बचाव'च्या टोप्या घालून प्रवेश केला आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही हीच टोपी घातली आहे. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.

मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल SCने नाकारला, कोर्टात नेमकं काय घडलं? OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होणार?

मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल SCने नाकारला, कोर्टात नेमकं काय घडलं? OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होणार?

नवी दिल्ली : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC political reservation) संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सादर केला होता.

आज सुप्रीम कोर्टाने हा अहवाल नाकारला आहे. सुप्रीम कोर्टाने अहवाल नाकारल्यामुळे राज्य सरकारसाठी हा एक मोठा झटका आहे. मागास आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारताना सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं? तसेच ओबीसी आरक्षणाच्याशिवाय आता निवडणुका होणार का?

याबाबत जाणून घेऊया. काय म्हटलं कोर्टाने? सुप्रीम कोर्टाने म्हटलं, राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय ओबीसी प्रतिनिधित्वाचीही माहिती उपलब्ध नसल्याचं कोर्टाने म्हटलं. तसेच नेमक्या कुठल्या कालावधीतील माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला गेला आहे यासंदर्भातही स्पष्टता नाहीये.

आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाही सुप्रीम कोर्टाने हा अहवाल नाकारत असताना पुढील म्हटलं, पुढील निर्देश देईपर्यंत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक निवडणुका घेण्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या शिवाय होणार? की निवडणुका पुढे ढकलणार?

असा प्रश्न आहे. वाचा : OBC Reservation बाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला राजकीय आरक्षणाचा डेटा कोर्टाने मागितला सुप्रीम कोर्टाने म्हटलं, राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय ओबीसी प्रतिनिधित्वाचीही माहिती उपलब्ध नसल्याचं कोर्टाने म्हटलं. तसेच नेमक्या कुठल्या कालावधीतील माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला गेला आहे यासंदर्भातही स्पष्टता नाहीये.

विधीमंडळात पहिल्याच दिवशी गोंधळ, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी एका मिनिटात थांबवलं अभिभाषणमुंबई

विधीमंडळात पहिल्याच दिवशी गोंधळ, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी एका मिनिटात थांबवलं अभिभाषण

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास आज सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार, असे वाटत असतानाच विधिमंडळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषणास सुरुवात केली. त्याचवेळी घोषणाबाजीला सुरुवात झाल्याने राज्यपालांनी अवघ्या एका मिनिटात आपले भाषण आटोपले. त्यानंतर ते विधीमंडळातून बाहेर पडले. 

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच अत्यंत वादळी झाली. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असताना विधीमंडळात घोषणाबाजीला सुरुवात झाली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणाबाजी केली. तर विरोधी भाजपच्या नेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या राज्यपालांनी अवघ्या एका मिनिटात भाषण पटलावून ठेवून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळातून बाहेर पडल्यानंतर सर्वचजण बुचकाळ्यात पडले.

सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकाकडे बोट
त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीने राज्यपालांच्या या कृतीचे निदर्शने करीत निषेध केला. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करून राज्यपालांच्या कृतीविषयी नापसंती व्यक्त केली. तर भाजप नेत्यांनी याचे खापर महाविकासआघाडीवर फोडण्याचा प्रयत्न केला. राज्यपाल सभागृहात आले तेव्हापासूनच महाविकासआघाडीचे नेते गोंधळ घालत होते. अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत सुरु करण्यासाठीही राज्यपालांना तीनवेळा विनवण्या कराव्या लागल्या. तसेच सभागृहाचे कामकाज चालवणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, विरोधकांची नव्हे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले.

संजय दौंड यांचे शीर्षासन
राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडलं आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले.. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. आमदार संजय दौंड यांनी तर शीर्षासन अर्थात खाली डोकं वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला.

Wednesday, March 2, 2022

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही - जयंत पाटील

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही - जयंत पाटील

मुंबई - विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज(दि.2, बुधवार) ठणकावून सांगितले.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्पष्ट केला.

नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली, असे जयंत पाटील म्हणाले.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...