Sunday, October 3, 2021

भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय, भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा पराभव

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election)मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता.



मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन झालीय. अशावेळी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केलाय. (CM Mamata Banerjee wins Bhawanipur Assembly by-election)

भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. एकूण 21 राऊंड झाले. त्यानंतर 58 हजार 832 मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिवळला आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून हॅटट्रिक मिळवली आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. अशावेळी 6 महिन्याच्या आत त्यांना निवडणूक लढवणं गरजेचं होतं. त्यामुळे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून शोभनदेव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर पार पडलेल्या पोटनिवडणुकीत अखेर ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...