नवी दिल्ली : हिंदुस्थानात रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि जलद मानला जातो. मात्र अनेकदा रेल्वे गाड्या उशिराने धावतात ज्याचा फटका हा प्रवाशांना बसतो. आजपर्यंत या लेटलतिफी विरोधात प्रवासी बोलत नव्हते, मात्र 2 प्रवाशांनी रेल्वे विभागाला चांगला इंगा दाखवला आहे. रेल्वेगाडीला उशीर झाल्याने या प्रवाशाचं विमान सुटलं होतं. ज्यामुळे या प्रवाशाला आर्थिक मानसिक आणि शारिरीक आणि मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रवाशांनी रेल्वेच्या विरोधात दाद मागितली होती, ज्यात त्यांना विजय मिळाला आहे.
रमेश चंद्र आणि कांचन चंद्र हे प्रयागराज एक्सप्रेसने नवी दिल्लीला जात होते. ही ट्रेन 12 एप्रिल 2008 रोजी सकाळी 6.50 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र ही ट्रेन 5 तास उशिराने म्हणजे 11.30 वाजता नवी दिल्ली स्थानकात पोहोचली होती. नवी दिल्लीला उतरून रमेश चंद्र आणि कांचन चंद्र यांना कोच्चीला जायचं होतं.
ट्रेन उशिरा आल्याने या दोघांचं कोच्चीला जाणारं विमान निघून गेलं. यामुळे हे दोघे संतापले होते. या दोघांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे रेल्वेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या दोघांनी 19 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. ग्राहक मंचाने या दोघांची बाजू योग्य असल्याचं म्हण रेल्वेला या दोघांना 40 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाला रेल्वे विभागाने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे आव्हान दिलं होतं. तिथेही निकाल रेल्वे विभागाच्या विरोधात गेला होता. यानंतर रेल्वे विभागाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडेही दाद मागितली होती. तिथेही निकाल विरोधात गेल्याने रेल्वे विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहक न्यायालयाने ग्राहक आयोगाचे आदेश योग्य ठरवत रेल्वे विभागाला अखेरचा दणका दिला. न्यायालयाने 4आठवड्यांच्या आत 25 हजार रुपये कोर्ट रजिस्ट्रीमध्ये भरण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment