Wednesday, August 11, 2021

मुंबईकरांनो, लोकल रेल्वेचा पास हवाय ? तर मग 'हे' काम करा

मुंबई : करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.



आज, बुधवारपासून मुंबई महानगर प्रदेशातील विविध रेल्वे स्थानकांतून केवळ मासिक पास दिले जाणार असून, त्यासाठी १०९ रेल्वे स्थानकांत आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करताना पास, ओळखपत्र तसेच लसीकरण प्रमाणपत्र प्रवाशांना बाळगावे लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.


लसीकरण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती.

त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यावर मिळणारे 'युनिव्हर्सल क्युआरकोड' ओळखपत्र असलेल्यांना मात्र लसीकरण प्रमाणपत्र बाळगण्याची आवश्यकता नाही.

लशीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी केवळ मासिक पास काढणाऱ्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.दैनंदिन तिकीटासाठी ही सुविधा मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.


त्यासाठी बुधवारपासून लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी करण्यात येणार असून प्रवाशांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड) रेल्वे स्थानकातील मदत कक्षातील कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्यावीत.


मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर ५३ स्थानकांत तर संपूर्ण महानगर प्रदेशात १०९ स्थानकांत मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही सुविधा मिळणार आहे.


त्यानुसार प्रवाशांना अ‍ॅप आणि संकेतस्थळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यावरून आवश्यक दस्तावेजांच्या माध्यमातून युनिव्हर्सल ओळखपत्र दिले जाणार असून अन्य ओळखपत्राप्रमाणे याचा उपयोग करून रेल्वे पास काढता येईल.


ऑनलाइन पद्धतीने पास काढणाऱ्यांना प्रवासात केवळ पास आणि युनिव्हर्सल ओळखपत्र बाळगावे लागेल. ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...