Wednesday, August 4, 2021

अखेर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख ठरली

 मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रविवारी ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे ही परीक्षा घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार ही परीक्षा पुढच्या महिन्याच्या सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली आहे. ही परीक्षा लवकर घेण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी मोठा संघर्ष केले होते त्यामुळे या परीक्षेची तारीख जाहिर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा यावेळी मिळाला आहे



महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- संयुक् पूर्व परीक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलण्यात आली होती. आता, या परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सरकारी यंत्रणेवरही यामुळे ताण होता. त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता, राज्यातील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानंतर या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ची संयुक्त पुर्व परीक्षा आता सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तसे पत्रही जारी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन हे पत्र शेअर करत परीक्षेसंदर्भात माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...