नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढील सूचना येईपर्यंत लिपीक पदाची मुख्य परीक्षा 2021 पुढे ढकलली आहे. एसबीआय लिपीक मुख्य परीक्षा 31 जुलै 2021 रोजी होणार होती. परीक्षेच्या पुढील अपडेटससाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊ शकतात. एसबीआय क्लार्क पदाची पूर्व परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये 10 जुलै ते 13 जुलै दरम्यान घेण्यात आली. पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पूर्व परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेस बसू शकतात.
एसबीआय लिपिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू झाली होती.
या भरती मोहिमेद्वारे 5000 हून अधिक ज्युनिअर असोसिएटपदावर भरती होणार आहेत. उमेदवारांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना पूर्व , मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यशस्वी होणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची देशभरातील बँकेच्या विविध शाखांमध्ये नेमणूक केली जाईल.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
एसबीआय क्लार्क मुख्य परीक्षेमध्ये 190 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दोन तास चाळीस मिनिटांच्या वेळ दिला जाईल. सामान्य / आर्थिक जागरुकता , सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक वृत्ती आणि तर्क क्षमता तसेच संगणक योग्यता यांद्वारे प्रश्न विचारले जातात. नवीन परीक्षेच्या तारखेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यास सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment