मुंबई : मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. (Drinking fenugreek water is beneficial for health)
मेथीचे पाणी तयार करण्याची पध्दत
एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या.
त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते. हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले पाहिजे. ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील.
मेथीचे पाणी पिण्याचे फायदे
1. मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.
2. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात. हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब होतील.
3. मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते.
4. मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे. मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीच्या बियामध्ये अमीनो अॅसिड असते. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
5. मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
6. हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे. मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो.
7. मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
No comments:
Post a Comment