Tuesday, March 8, 2022

केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत तन्वी फाउंडेशनच्या ज्योती पाटील यांचा भाजप प्रवेशअभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत अनेक महिला दिनी अनेक महिलांचा सत्कार

केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत  तन्वी फाउंडेशनच्या ज्योती पाटील यांचा भाजप प्रवेश

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत अनेक महिला दिनी अनेक महिलांचा सत्कार

ठाणे  : जागतिक महिलादिनी केंद्रीयमंत्री कपिल पाटील याच्या उपस्थितीत दिव्यातील समाजसेविका व तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती राजकांत पाटील या दामपत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. समाजसेविका सौ ज्याती पाटील तन्वी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला पतपेढी तसेच अनेक महिलांचे बचत गट चालवत असल्याने दिवा शहरातील अनेक महिलांना रोजगार व कमवण्याची संधी मिळाली आहे. अनेक सामाजिक उपक्रम व शिबीर आयोजित करत असतात.

 आज जागतिक महिलादीना निमित्त अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थित अनेक महिलांचा प्रशिस्तपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ज्योती पाटील यांचं कौतुक केले.

तन्वी फाऊंडेशनच्या ज्योती राजकांत पाटील यांनी महिला दिनाच्या मुहूर्तlवर केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, दिवा भाजप मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, विजय भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनेक बचत गटाच्या महिलांसह भाजप मध्ये प्रवेश केला असल्याने दिव्यात भाजपचे पारडे जड झाले आहे.

Monday, March 7, 2022

एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?

एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?'
मुंबई : मध्यंतरी काही लोक सोडून गेले, जे गेले ते गेले, त्याची चिंता करायचे कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी केले. ते बऱ्याच वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.

जोपर्यंत मला साथ आहे, तोपर्यंत या राज्याच्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी काम करतच राहणार, असा विश्वास त्यांनी बोलुन दाखवला. सोबतच रशिया-युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.

राज्यातील जनतेने भरभरून साथ दिली. एकदा नाही तर चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे, असे ते यावेळी म्हणाले.

सोनाराने कान टोचताच हार्दिक पांड्या सरळ झाला; गपगूमान NCAत दाखल होण्यास तयार झाला

सोनाराने कान टोचताच हार्दिक पांड्या सरळ झाला; गपगूमान NCAत दाखल होण्यास तयार झाला

मुंबई : , इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) १० दिवसांचे फिटनेस कॅम्प भरवले आहे.


पण, त्यात न जाता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने अहमदाबाद येथेच तंदुरूस्तीसाठी मेहनत घेणार असल्याचे कळवले. मात्र, निवड समितीने दम भरला आणि हार्दिकला यू टर्न घ्यावा लागला. आता हार्दिक फिटनेस कॅम्पसाठी NCA मध्ये दाखल होण्यास तयार झाला आहे.

''होय, हार्दिक पांड्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे. कॅम्पसाठी बोलावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता, त्यानं त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणतेच अपडेट दिले नव्हते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे संकेत निवड समितीने त्याला दिले. त्यानतंर त्याचे नाव या यादीत समाविष्ठ करण्यात आले. मंगळवारी तो कॅम्पमध्ये दाखल होईल,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport.ला सांगितले.

हार्दिक NCA कॅम्पला सतत दांडी मारत होता आणि त्यावरून निवड समिती नाराज होती. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या शर्यतीत अजूनही हार्दिक पांड्या आहे. पण, त्याने मुंबई व अहमदाबाद येथेच तंदुरुस्तीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण, निवड समिती अध्यक्षांचा एक फोन गेला अन् हार्दिकनं निर्णय बदलला. आता हार्दिकच्या तंदुरुस्तीवर NCA त लक्ष ठेवले जाईल आणि तो आयपीएल २०२२ साठी फिट झाल्यास त्याचा जूनमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही विचार केला जाईल.

BCCIने मागील आठवड्यात इशान किशन, भुवनेश्वर कुमार व वेंकटेश अय्यर यांच्यासह २५ खेळाडूंना NCA कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. NCA अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली हा कॅम्प भरवला गेला आहे. हार्दिकचा भाऊ कृणाला याला मात्र या कॅम्पसाठी बोलावलेले नाही.

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईत कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

अनेक जण घरातच राहण्यास पसंती देत आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचं संकट गडद होणार आहे, असे अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर 2050 पर्यंत ही पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी इतके नुकसान होईल, अशी भीती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या भागात व्यक्त करण्यात आली.

2070 पर्यंत यात 2.9 पटीने वाढ होईल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. पळून जाऊन बहिणीशी लग्न केल्यानं घेतला सिनेस्टाईल बदला,नालासोपाऱ्यातील थरारक घटना मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो. दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे. भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार असून, मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळात वाढ होईल. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जर उत्सर्जन वेगाने कमी केले नाही तर जागतिक पातळीवर उष्णता आणि आर्द्रता लवकरच धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ग्लोबल वार्मिगमुळे पृथ्विचे कालचक्रच बदलण्याची भीती संशोधक व्यक्त करत आहेत

Friday, March 4, 2022

आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार

आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
मुंबई : 
जीव मुठीत धरुन विद्यार्थी युक्रेनमध्ये विद्यार्थी दिवस काढत आहे. अशी परिस्थितीत पंतप्रधान उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते,

परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणं झालंय -शरद पवार

युक्रेन हा अतिशय सुंदर देश. आपल्या इथे मेडिकल साठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थी तिथे जातात. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज

उद्या काही अडचण आली, तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे
पुणे (Pune) मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरूड) पर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. शरद पवारांनी जलसंपदा विभाग लक्ष घालेल असं म्हटलंयनदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी अभियान ;

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी अभियान ;  राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने केली स्वाक्षरी

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून स्वाक्षरी मोहीम सुरु केली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी स्वाक्षरी करायला लावली. यावेळी आंदोलनामुळे झिरवळ यांनी भाजपच्या स्वाक्षरी फलकावर मलिक यांच्या विरोधात केली.

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्यावतीने मलिकांच्या राजीमान्यासाठी भाजपवच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅनर तयार करण्यात आले होते. यावेळी आजही विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मलिकांचे हसीना पारकर आणि कुख्यात गुंड दाऊद इब्रहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. दरम्यान आज विधीमंडळ परिसरात राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेसाठी भाजपने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली.

भाजपचे आंदोलन सुरु असताना नरहरी झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत होते. यावेळी त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोधळा दरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली.

Thursday, March 3, 2022

ओबीसी आरक्षणवरून फडणवीस आक्रमक, सभागृह तहकूब

ओबीसी आरक्षणवरून फडणवीस आक्रमक, सभागृह तहकूब 

मुंबई - आज अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाविरोधात वातावरण चांगलंच तापलं असून सभागृहात भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

यातच विधानसभेत ओबीसी आरक्षणावरील चर्चेत गोंधळ झाला असून, भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात 'ओबीसी बचाव'च्या टोप्या घालून प्रवेश केला आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही हीच टोपी घातली आहे. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...